Wednesday, April 24, 2024
Homeशैक्षणिकमायक्रोफायनान्स मधील करिअर

मायक्रोफायनान्स मधील करिअर

मायक्रोफायनान्स म्हणजे ढोबळमानाने सूक्ष्म वित्त पुरवठा म्हणता येईल. या संकल्पनेचा संबंध ग्रामीण विकासाशी जोडला जातो. मायक्रोफायनान्स कंपन्यांद्वारे ग्रामीण भागातील जनतेला वित्तीय सुविधा प्रदान केल्या जातात. या सुविधांच्या आधारे ग्रामीण भागातील जनता आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकते. या विषयाचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. या विषयात पदवीका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याचबरोबर व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमात मायक्रोफायनान्स हा विशेष अभ्यासाचा (स्पेशलायझेशन) विषय आहे. मायक्रोफायनान्समधील पदवीका मिळवण्यासाठी कोणत्याही शाखेच्या पदवीधरांना प्रवेश घेता येतो. मात्र ज्यांनी वाणिज्य विषयातून पदवी मिळवली आहे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे अशांना या क्षेत्रात यशस्वी करिअर करता येते असा अनुभव आहे.

देशात गेल्या काही वर्षात अनेक मायक्रोफायनान्स कंपन्या चालू झाल्या आहेत. एसकेएस, साधना, मायक्रोफिन सोसायटी, बंधन, अस्मिता मायक्रोफिन लिमिटेड, कॅस्पर मायक्रो क्रेडिट आदी कंपन्या चालू झाल्या आहे. या कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना बँक, विमा कंपन्यांच्या नोकऱ्या मिळताना फायदा होतो. प्रारंभी या क्षेत्रात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना सात ते आठ हजार एवढे वेतन मिळते.

- Advertisement -

मायक्रोफायनान्सचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था खालील प्रमाणे आहेत.
१ इन्स्टिट्युट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद
२ इंडियन इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग ॲण्ड फायनान्स, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई.
३ नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, हैदराबाद
४ इन्स्टिट्युट ऑफ फायनांशियल मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च, चेन्नई.
५ बेसिक्स, हैदराबाद.

- Advertisment -

ताज्या बातम्या