आपण चांगले टीम लीडर आहात !

आपण चांगले टीम लीडर आहात !

नेतृत्वक्षमता सर्वांकडे असते, परंतु ती ओळखता येत नाही किंवा त्यावर अंमल करता येत नाही. नेतृत्व करणारा व्यक्ती हा रुबाबदार, देखणा असावा असे काही नाही. साधा व्यक्ती देखील समूहाचे, गटाचे, देशाचे नेतृत्व करु शकतो. नेतृत्व करण्यासाठी संवाद कौशल्य, सामान्य ज्ञान, अडचणी सोडण्याची ताकद, गटाला एकत्र बांधण्याची क्षमता आदी गुणांच्या जोरावर तो नेतृत्व करत असतो. नेतृत्वातही फरक आहेत.

अ‍ॅलेक्झांडर डेन हीजर यांच्या मते, आपण एखाद्या गटासाठी काम करत आहोत, असे जर वाटत असेल तर तुम्ही महान लीडर आहात, मात्र टीम आपल्यासाठी काम करत आहे, असे जर वाटत असेल तर तुम्ही सामान्य लीडर आहात. आपण जर सुपरवायजर किंवा मॅनेजर असाल तर आपल्याकडे पदाचे अधिकार, ताकद आहे. या आधारावर आपण सहकार्‍यांवर आणि अन्य मंडळींवर नियंत्रण ठेऊ शकतो आणि कंपनीचे ध्येय पूर्ण करु शकतो.

अनेकदा तर आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतानाही आजूबाजूला असणार्‍या लोकांवर प्रभाव टाकू शकतो. या प्रकारच्या प्रभावाला आपण वैयक्तिक शक्ती म्हणतो. मार्गदर्शन करण्यासाठी, विश्‍वास संपादन करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण गटाच्या ध्येयावर लक्ष्य केंद्रीत करावे लागते. सर्वांना एक सूत्रात बांधून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित केल्यास समूह आपल्याकहे एक टीम लीडर म्हणून पाहिल. पदावर असलेल्या व्यक्तीकडे अनेक अधिकार असतात. या जोरावर तो कामावर नियंत्रण ठेवतो आणि संचलन करतो. एखाद्या गटाकडून आपण कसे काम करुन घेता आणि तो गट कशा रितीने काम करतो याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे कळत नकळतपणे आपल्या अधिकाराला मान्यता मिळते अणि नेतृत्व सर्वमान्य होते. अर्थात सर्वांकडेच पदाची शक्ती असतेच असे नाही. काही मंडळी पद नसतानाही हुकुमत गाजवत असतात.

जोपर्यंत आपण दुसर्‍यांसाठी प्रेरणादायी किंवा मार्गदर्शक ठरत नाहीत, तोपर्यंत आपल्या नेतृत्वगुणाला वाव मिळणार नाही. नेतृत्वक्षमता, प्रेरणा ही मनातून निर्माण होते. यशस्वी नेता या सर्व गोष्टी जाणून असतो. समोरील व्यक्तीला काय हवे आणि काय नको याचा मानसिक अभ्यास करुन वाटचाल करत असतो. एखाद्या व्यक्तीची गरज काय आहे, हे ओळखूनच तो रणनिती आखत असतो. लोकांच्या आशा, अपेक्षा जाणून घेणारा व्यक्तीच समाजाचे, गटाचे नेतृत्व करण्याची क्षमता बाळगून असतो. एखाद्या गटाचे नेतृत्व करण्यापूर्वी त्या गटाचा, समूहाचा, परिस्थितीचा, वातावरणाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

अनेक सामान्य व्यक्तींनी असामान्य नेतृत्वकेले आहे. जगभरात त्याचे भरपूर उदाहरणे सापडतील. जर्मनीत काही दिवस मजुरी करणारा आणि अनाथालयात राहणारा हिटलर पुढे हुकुमशहा बनला. त्याने जर्मनीतील लोकभावना जाणून घेतल्या आणि त्या भावनांवर नियंत्रण करत देशाचे नेतृत्व मिळवले. म्हणून कोणत्याही गटाचे नेतृत्व करताना लोकांचे अवलोकन करावे लागेल आणि त्यासाठी विश्‍लेषक शक्तीचा वापर करावा लागेल. ते कशा रितीने हसतात, किंवा कशा प्रकारे उत्साहित होतात, कोणती गोष्ट त्यांना प्रेरणादायी ठरते या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. कोणत्या गोष्टींने ते नाराज, दु:खी होतात, ते पाहा. त्यांच्या नजरेला नजर मिळवून त्यांच्या वेदना, दु:ख जाणून घ्या. काळानुसार या गोष्टी आपण शिकतो आणि तेच पुढे इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com