निर्भयासाठी अण्णांचे मौन
Featured

निर्भयासाठी अण्णांचे मौन

Sarvmat Digital

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – दिल्लीतील निर्भया प्रकरण गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होऊन निर्भयाला न्याय मिळावा, यासाठी 20 डिसेंबरपासून मौन धारण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. तसेच हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.

देशभर सध्या घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना अस्वस्थ करणार्‍या आहेत. अत्याचाराच्या घटनांमध्ये आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायला हव्यात. वर्षानुवर्षे आरोपींना शिक्षा होत नसल्याने गुन्हे करणारांचे मनोबल वाढत आहे. सात वर्षापूर्वी दिल्ली येथे निर्भयावर अत्याचार झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशात आंदोलने झाली होती. अद्यापही निर्भया न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. या शिवाय देशभर घडलेल्या इतर अशाच अनेक घटनांतील आरोपींनाही कठोर शासन होणे अपेक्षित आहे. हैदराबाद येथे घडलेली अत्याचाराची घटनाही काळीमा फासणारी आहे. निर्भयासारख्या प्रकरणात लवकर न्याय मिळत नसल्याने हैदराबाद एन्काउंटरला जनतेचा पाठिंबा मिळतो, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com