Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रवैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा 15 जुलैपासून – अमित देशमुख

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा 15 जुलैपासून – अमित देशमुख

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – राज्यातील करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन परीक्षेचे नियोजन केले जात असून, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा 15 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यात देशमुख यांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला आणि अनेक विषयावर भाष्य केले. देशमुख म्हणाले, तसेच वैद्यकीय विभागाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष ठरलेल्या वेळेनुसार सुरू करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. पण त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

राज्यात एका बाजूला करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत बरे होऊन घरी जाणाऱयांची संख्यादेखील अधिक प्रमाणात आहे. हे दिलासादायक चित्र आहे. या परिस्थितीत मृत्यू दर कशा प्रकारे कमी करता येईल, याकडे सरकारचे लक्ष आहे.

आरोग्य विभागातील पदभरतीसाठी मंजुरी
देशमुख म्हणाले, राज्यातील अनेक भागात डॉक्टर्स, नर्स युद्धपातळीवर काम करीत आहेत. त्या सर्वांच्या कार्याला माझा सलाम आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, नर्स किंवा आरोग्य विभागातील जी काही पदे रिक्त असतील. ती भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून, त्यासंदर्भातील कार्यवाहीस सुरुवात झाली आहे.
मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही करोना चाचणीचे दर निम्म्यावर आणणार
पुण्यात करोना टेस्ट करण्यासाठी साडेचार हजारांहून अधिक दर खासगी लॅब आकारतात. याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले, राज्य शासनाने मुंबईत दोन हजार रुपये दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर पुण्यातदेखील निम्म्यावर दर आकारले जावेत, याबाबत सरकार निर्णय घेईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या