Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedधुळ्यात दारुचे गोदाम सील

धुळ्यात दारुचे गोदाम सील

सोनगीर  – 

धुळे तालूक्यातील लामकानी येथील बनावट दारू बनविण्याचा कारखाना पोलीसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर आज बनावट दारूसाठी लागणार्‍या बाटल्या, बूच व इतर साहित्य असलेले धुळ्यातील गोदाम पोलीसांनी सील केले आहे. दरम्यान, अटकेतील सहा संशयितांना आज न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला.

- Advertisement -

लामकानी येथे ब्रँडेड दारूसारखीच बनावट व आरोग्यास धोकादायक दारू बनविली जात होती. तो कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यासंदर्भात अटक केलेल्या संशयित समाधान भिका धनगर, ज्ञानेश्वर शांतीलाल पाटील, निलेश रमेश पाटील (सर्व रा. लामकानी), रोहित राजू पटाईत, शशिकांत मच्छिंद्र मगर (दोन्ही रा. भीमनगर, धुळे), भैय्या बापू निकम (सैताळे) यांनी बनावट दारूच्या बाटल्या तसेच बनावट दारू तयार करण्याचे धुळ्यातील ठिकाणाबाबत पोलीसांना माहिती दिली.

त्यांच्याकडून सुमारे 77 हजार रुपयांची बनावट दारू व साहित्य जप्त केली. गुन्ह्याच्या तपासात अटक संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार धुळ्यातील एका गोदामावर छापा टाकण्यात येवून ते सील करण्यात आले. गोदामाचा मालक अनिस अहमद मोहमद इस्माईल उर्फ टेलर (रा. प्लॉट 20, मुल्ला नगर, 100 फुटी रोड धुळे) हा फरार आहे.

गोदामामध्ये दारूसाठी वापरण्यात येणार्‍या खाली बाटल्या, स्टिकर, बूच मिळून आली. कारवाई उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, सोनगीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पो. कॉ. अतुल निकम, सदेसिंग चव्हाण, शाम अहिरे, शिरीष भदाणे, अविनाश पाटील यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या