पटवर्धन चौकातील हॉटेलला आग ; जिवीतहानी टळली
Featured

पटवर्धन चौकातील हॉटेलला आग ; जिवीतहानी टळली

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – पटवर्धन चौकातील हॉटेल आनंदमध्ये आज सकाळी आगीचा भडका उडाला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. परंतु ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

हॉटेल आनंदमध्ये सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आगीने भडका घेतला. हॉटेलमधील स्वयंपाक गृहातच आग लागली. सुरूवातीला ही आग सिलिंडरमधील गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामुळे लागली असे सांगितले जात आहे.

हॉटेल मालक अशोक वाकळे यांनी ही आग शॉकसर्किटमुळे लागल्याचा दावा केला आहे. या आगीमुळे हॉटेलच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com