कोल्हापूरचे पालकत्व स्वीकारण्यास ना. बाळासाहेब थोरातांचा नकार!

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. परंतु थोरात यांनी हे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन थोरात आपला निर्णय कळवणार आहेत.

दरम्यान, ना. थोरातांकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदासह महसूलमंत्रिपद आहे. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच पालकमंत्रिपद घेण्यास नकार दिला होता. तरीही संगमनेरचे आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

तर कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले आमदार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अहमदनगरचे पालकमंत्रिपद सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद द्यावे आणि आपल्याऐवजी काँग्रेसमधील सहकार्‍याला अहमदनगरचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी विनंती थोरात करणार आहेत.

विश्वजीत कदमांना मिळू शकते संधी
काँग्रेसच्या बारा मंत्र्यांपैकी 11 मंत्र्यांना पालकमंत्रिपदं मिळाली आहेत, मात्र डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे एकाही जिल्ह्याचे पालकत्व नाही. त्यामुळे अहमदनगरचं पालकमंत्रिपद कदम यांना मिळण्याची चिन्हं आहेत. विश्वजीत कदम हे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. विश्वजीत यंदा सांगलीतील पलुस कडेगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्याकडे सहकार, कृषी, सामाजिक न्याय अशा विभागांचं राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *