Wednesday, April 24, 2024
Homeनगरसिव्हील सर्जन घेतात खासगी दवाखान्यात उपचार

सिव्हील सर्जन घेतात खासगी दवाखान्यात उपचार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सिव्हील हॉस्पिटलचे प्रमुख असलेले जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) डॉ. प्रदीप मुरंबीकर खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार सुधीर भद्रे यांनी उघडकीस आणला आहे. त्यांच्या आजारपणाची चौकशी करावी अशी मागणी करतानाच भद्रे यांनी त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्येच उपचार घ्यावेत अशी मागणी केली आहे. सिव्हंील सर्जन जर खासगी दवाखान्यात उपचार घेत असतील तर जनतेने शासकिय रुग्णालयात मिळणार्‍या वैद्यकिय सुविधांवर सामान्य जनतेने विश्वास कसा ठेवावा? असा सवाल त्यांनी केला आहे.

सिव्हील हॉस्पिटलमध्ये अनेक वॉर्डात घाणीचे साम्राज्य आहे. रुग्णांना असुविधांना तोंड द्यावे लागते. रुग्णालयामधे अत्याधुनिक मशिनरी असल्या तरी त्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती नसल्याने त्या बंद आहेत. सिव्हील हॉस्प्टिलमधील असुविधेबाबत डॉ. मुरंबीकर यांना दुरध्वनी केला अथवा वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आले की लगेच त्यांच्या छातीत दुखते व ते खाजगी रुग्णालयात दाखल होतात . किरकोळ विषय हाताळताण्यासाठी सक्षम नसलेले मुरंबीकर ‘मला लोड देऊ नका अन्यथा मी अ‍ॅडमिट होईल’ असे उत्तर देत असल्याचा आरोप भद्रे यांनी केला आहे.

- Advertisement -

सिव्हील सर्जन डॉ. मुरंबीकर यांची सर्वांगीण तपासणी व उपचार जिल्हा शासकिय रुग्णालयातच व्हावेत तसेच त्यांच्यावर आतापर्यंत खाजगी रुग्णालयात किती सरकारी खर्च झाला आहे याची चौकशी करावी. झालेला खर्च हा योग्य आहे कि बिले काढुन खिसा भरण्याचा प्रकार आहे याची तपासणी करावी अशी मागणी सुधीर भद्रे यांनी केली आहे. डॉ. मुरंबीकर यांच्याऐवजी स्वस्थ जिल्हा शल्य चिकित्सकाची नियुक्ती जिल्हा शासकिय रुग्णालय करावी.

त्यातून जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातुन आलेल्या रुग्णांवर योग्य उपचार होतील व रुग्णांची शारिरीक, मानसिक व आर्थिक छळातुन मुक्तता होईल अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन, डोंगरगणचे सरपंच कैलास पठारे, युवाआघाडी प्रमुख अशोक ढगे, डॉ. प्रशांत शिंदे, बबलु खोसला, वीर बहादुर प्रजापती, जसवंत सिंह परदेशी व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या