Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरनगर: काँग्रेसला नकोय चिन्ह

नगर: काँग्रेसला नकोय चिन्ह

कॅन्टोमेंट अध्यक्षांकडे केली मुक्त चिन्हांची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाच्या निवडणुकीत मुक्त चिन्हांचा वापर करावा अशी मागणी भिंगार काँग्रेसने बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर राणा यांच्याकडे केली आहे. निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाईल असे आश्‍वास राणा यांनी दिल्याची माहिती अ‍ॅड. आर. आर. पिल्ले यांनी दिली.

- Advertisement -

2007 पूर्वीच्या कॅन्टोमेंट बोर्डाच्या निवडणुकांमध्ये मुक्त चिन्हांचा वापर करण्यात येत होता. 2007 नंतर मात्र निवडणुकीत राजकीय पक्षांच्या चिन्हांचा वापर सुरू झाला. पक्षीय चिन्हांमुळे राजकीय रस्सीखेचाचे राजकारण सुरू झाले. नागरी सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुका लढविणारे स्वतंत्र-अपक्ष उमेदवार राजकीय पक्षाच्या चिन्हांच्या भाऊगर्दीत मागे पडले. विकासाचा मुद्दा मागे पडून राजकारणावर निवडणुका होत असल्याने राजकीय वैमनस्य निर्माण होऊ शकते असा मुद्दा उपस्थित करत भिंगारमध्ये मुक्त चिन्हांचा वापर करून निवडणुका घेण्याची मागणी अ‍ॅड. पिल्ले, रिजवान शेख यांनी केली.

निवडणूक प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी राजकीय पक्षाचे चिन्हच नको असे श्यामराव वाघस्कर यांनी यावेळी सांगितले. संजय झोडगे, संजय खडके, निजाम पठाण, संतोष धीवर, महिलाध्यक्ष मार्गारेट जाधव, अ‍ॅड. साहेबराव चौधरी, संतोष फुलारी, संतोष कांबळे, अनिल वराडे, संतोष कोलते, दीपक लोखंडे, लक्ष्मण साखरे, जालिंदर आळकुटे, विशाल विश्‍वकर्मा, मंदा होंंडगे, सुनील उल्हारे, सुभाष त्रिमुखे, सोपान सोळुंके यांच्या शिष्टमंडळाने ब्रिगेडिअर राणा यांच्याकडे ही मागणी केली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करताना नागरिकांच्या मतांचा आदर केला जाईल, तसा प्रस्ताव आयोगाला पाठविला जाईल असे आश्‍वासन राणा यांनी दिल्याचे अ‍ॅड. पिल्ले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या