वाळू तस्करांविरुद्ध संगमनेरात धडक कारवाई
Featured

वाळू तस्करांविरुद्ध संगमनेरात धडक कारवाई

Dhananjay Shinde

जेसीबी, डंपरसह 17 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारातील गाव ओढ्यातील शासकीय वाळू बेकायदेशीररित्या उपसा करुन तिची वाहतूक करणार्‍या वाळू तस्कारांविरुध्द उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांनी धडक कारवाई केली आहे. 6 ब्रास वाळू व जेसीबी व डंपर अशी दोेन वाहने असा एकूण 17 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई काल शुक्रवारी पहाटे 2.45 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पाचजणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील चिंचोलीगुरव शिवारातील गाव ओढ्यातून बेकायदेशीररित्या जेसीबीच्या सहाय्याने वाळूचा उपसा करुन व डंपरच्या सहाय्याने तिची वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांना मिळाली. या माहितीनुसार श्री. पंडीत हे स्वत: व पोेलीस नाईक अनिल कडलग, शांताराम मालुंजकर, पोलीस कॉन्स्टेबल बापुसाहेब हांडे, संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. बढे, पोेलीस नाईक यमना जाधव, श्री. दातीर यांनी सदर ठिकाणी जावून छापा टाकला. या छाप्यात 15 हजार रुपयांची 6 ब्रास शासकीय वाळू, 7 लाख रुपये किंमतीचा हायवा डंपर एम. एच. 14 सी. पी. 9993 व 10 लाख रुपये किंमतीचा जेसीबी मशिन क्रमांक एम. एच. 16 ए. एम. 6668 असा एकूण 17 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

डंपर चालक साईनाथ शिवाजी कुवर (रा. गुरेवाडी, ता. सिन्नर), जेसीबी मशिन चालक वाल्मीक अशोक सोनवणे (रा. चिंचोली गुरव) व त्याचा साथीदार समाधान बबन मेढे (रा. चिंचोली गुरव), डंपर मालक गणेश भालेराव (रा. मुसळगाव, ता. सिन्नर), जेसीबी मालक बाळासाहेब रामनाथ सोनवणे (रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर) यांनी संगनमताने चिंचोली गुरव शिवारात शासकीय ओढ्यातील वाळू बेकायदेशीररित्या उपसा केली व ती भरुन घेवून जात असतांना आढळून आले. याबाबत पोलीस हेड कांन्स्टेबल संजय बढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील पाच जणांविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 4/2020 नुसार 379, 34, पर्यावरण संतुलन कायदा कलम 3/15 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. पी. जाधव करत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com