रेल्वे मालधक्क्यावर अपघात

रेल्वे मालधक्क्यावर अपघात

दांडेकरनगरातील तरुण ठार

शहरातील सुरत रेल्वे लाइन जवळील मालधक्क्यावर काम करीत असताना ट्रक आणि मालगाडीमध्ये दाबला गेल्याने दांडेकरनगरातील तरुण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली.

दांडेकरनगरातील सुरेश जयसिंग श्रीवास्तव (वय 30) हा तरुण सुरत रेल्वे गेट मालधक्क्यावर हमाली काम करण्यासाठी गेला होता. या वेळी ट्रक (क्र.एमएच 18 एम 1676) च्या मागील बाजूस उभा असताना ट्रकचालकाने अचानक ट्रक रिव्हर्स घेतला असता मालधक्क्यावर उभी असलेली मालगाडी व ट्रकमध्ये दाबला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषीत केले.

याप्रकरणी जीतलाल शिवकुमार श्रीवास्तव याने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com