नंदुरबार : दारुची वाहतूक करणारा ट्रक नाल्यात उलटला
Featured

नंदुरबार : दारुची वाहतूक करणारा ट्रक नाल्यात उलटला

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

मद्यसाठा घेऊन जाणार्‍या ट्रकचा पोलिसांनी पाठलाग केला असता चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक शहरातील नाल्यात पडला . ही घटना आज सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. दारुचे खोके वाहण्याच्या इराद्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. मात्र पोलिस घटनास्थळी तात्काळ पोहोचल्याने नागरिकांचा डाव फसला. यात पोलिसांच्या समक्ष संचारबंदी, जमावबंदी यासर्वाना हरताळ फासला गेला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर येथील नारायणपूर रोड व शास्त्रीनगर परिसरातून वाहणार्‍या नाल्यात ट्रक क्रमांक ( जी.जे. 18 एक्स 9790 ) हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. नारायणपूर रोड व शास्त्रीनगरमधील नाल्यात मद्यसाठा असलेला ट्रक पलटी झाला. ही खबर शहरात वार्‍यासारखी पसरताच संचारबंदी असूनही नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

सुरुवातीला पोलीस असूनही गर्दिवर नियंत्रण करता आले नाही. नंतर गर्दी कमी झाली.हा मद्यसाठा वैध आहे की अवैध हे अजून माहीत नाही. मात्र, हा माल अवैध असल्यामुळे ट्रक मधील इसम चोरवाटेने पसार झाले. पलटी झालेल्या ट्रकमधून तात्काळ दारूचे बॉक्स काढण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. सदर माल कोणाचा, ट्रक कोणाची, चालक कुठे गेला, त्याचा तपास केव्हा होईल, गुन्हा कसा दाखल होतो, मद्यसाठा अवैध की वैध याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

सर्व पोलीस प्रशासन घटनास्थळी उपस्थित होते एवढे निश्चित.सदर ट्रक चा संशय आल्याने पोलिस उपनिरीक्षक नासिर पठाण यांनी दुपारी पाठलाग केला. पोलिस आपला पाठलाग करीत असल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आल्याने ट्रक राष्ट्रीय महामार्ग वरून करंजी ओवारा मार्गे गावातून टाकली, नारायणपूरकडून शास्त्रीनगर मार्गे पसार होत असताना चालकाचा नाल्याजवल नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात पलटी झाली.

चालक पसार झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धिरज महाजन करीत आहेत असे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी सांगितले .

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com