धुळे : भाटपुरा येथे ४८ वर्षीय पुरूष करोना पॉझिटिव्ह

धुळे : भाटपुरा येथे ४८ वर्षीय पुरूष करोना पॉझिटिव्ह

शिरपूर तालुक्यातील भाटपूरा येथे आज एका 48 वर्षीय पुरूषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 82 झाली आहे. दरम्यान प्रशासनाने भाटपूरा गावासह परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

शिरपूर येथील प्रलंबीत 13 अहवालांपैकी भाटपूरा येथील 48 वर्षीय पुरूषाचा कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरीत 11 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तर एक अहवाल प्रलंबीत असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयाचे नोडल अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली.

दरम्यान भाटपूरा गावात कोरानाचा रूग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. तर प्रशासनाने गाव सील करण्याची कार्यवाही सुरू केली असून कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेवून त्यांची तपासणीचे कामही सुरू केले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 82 झाली असून यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत 48 जणांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे.

धुळे जिल्ह्यात वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत असून नागरिकांनीही प्रतिसाद देण्याची गरज आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com