नंदुरबारात 3 रुग्ण ; करोनाबाधितांमध्ये अधिकार्‍याचा समावेश
Featured

नंदुरबारात 3 रुग्ण ; करोनाबाधितांमध्ये अधिकार्‍याचा समावेश

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार शहरासह तालुक्यात आज कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. यात एक अधिकारी, एक महिला तर एक खानसामाचा समावेश आहे. यातील महिला पुर्वीपासूनच विलगीकरण कक्षात दाखल होती. या तीनही रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच त्यांच्या घराचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला असून तेथे फवारणी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील मच्छीबाजार परीसरात राहणारा 50 वर्षीय पुरुष हा हृदयाच्या उपचारासाठी नाशिक येथे गेला होता. तेथे त्या व्यक्तीने कोविड चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोना रूग्णाला नाशिक येथून परत आणण्यात आले. त्याच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येणार आहेत.

त्या रूग्णाच्या संपर्कातील 3 व्यक्तींना विलागीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या व्यक्तीला नंदुरबार रुग्णालयात दाखल केल्यानंतर परत एकदा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. रूग्ण राहत असलेला परीसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी फवारणी सुरू करण्यात आली असून बॅरीकेट्सही लावण्यात आले आहेत.

तालुक्यातील रजाळे येथील 35 वर्षीय महिलेचा कोरोना अहवालही आज पॉझिटीव्ह आला आहे. सदर महिला पुर्वीपासूनच विलगीकरण कक्षात उपचारार्थ दाखल होती. तसेच नंदुरबार येथील 48 वर्षीय पुरुष अधिकारीदेखील कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com