पुण्यात आज 208 रुग्ण करोना पॉझिटिव्ह
Featured

पुण्यात आज 208 रुग्ण करोना पॉझिटिव्ह

Dhananjay Shinde

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यामध्ये गुरुवारी दिवसभरात 208 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे पुण्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 4107 वर पोहोचली आहे तर आज दिवसभरात सात करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील करोनाबाधित मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या 227 झाली आहे.

आज दिवसभरात 159 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 169 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 4107 झाली आहे तर आत्तापर्यंत 2182 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील क्टिव्ह रुग्ण संख्या 1698 इअतकी आहे. आज दिवसभरात 1733 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

दरम्यान, पुणे विभागातील2 हजार 695 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 5 हजार 614 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 2 हजार 639 आहेत. विभागात करोनाबाधीत एकुण 280 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 201 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 717 बाधीत रुग्ण असून करोना बाधित 2 हजार 363 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 2 हजार 114 आहे. करोनाबाधित एकूण 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 192 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 192 ,सोलापूर जिल्हयात 17 ,कोल्हापूर जिल्हयात 43 , सांगली जिल्हयात 5 व सातारा जिल्हयात 15 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 181 करोना बाधीत रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 71 आहे. करोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 478 करोना बाधीत रुग्ण असून 175 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 270 आहे. करोना बाधित एकूण 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 59 करोना बाधीत रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 20 आहे. करोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 179 करोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 164 आहे. करोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com