भारतात डिसेंबरपर्यंत दोन कोटी बालकांचा होणार जन्म
Featured

भारतात डिसेंबरपर्यंत दोन कोटी बालकांचा होणार जन्म

Dhananjay Shinde

सार्वमत

नवी दिल्ली – भारतात डिसेंबर महिन्या अखेर 2.41 कोटीहून अधिक बालकांचा जन्म होण्याची शक्यता असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रे बाल निधीने(युनिसेफ) व्यक्त केला आहे. तर, करोनाच्या काळात जगभरात 11.6 कोटी बालके जन्माला येतील असा अंदाजही युनिसेफने व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागाच्या जागतिक लोकसंख्या अंदाज 2019 या अहवालातील आकडेवारी समोर आली आहे. जागतिक मातृत्व दिन 10 मे रोजी आहे.

त्या आधी युनिसेफने हा शक्यता वर्तवली आहेकरोना प्रादुर्भावाच्या संकट काळात गरोदर महिलांना तसेच मागील 40 दिवसांमध्ये जन्मलेल्या बालकांना आरोग्य सेवांच्या बाबतीत मोठ्या अडचणींचा सामना करावा आहे.युनिसेफच्या अहवालातील आकडेवारीनुसार, करोनाच्या संकट काळात 11.6 कोटी बालकांचा जन्म होईल.

मुले जन्माला येण्याचा हा अंदाज 40 आठवड्यांच्या कालावधीमधील आहे. भारतात 11 मार्चपासून 16 डिसेंबर दरम्यान 2 कोटीहून अधिक बालकांचा जन्म होण्याचा अंदाज युनिसेफने व्यक्त केला आहे. भारतानंतर चीनमध्ये 1.35 कोटी, नायझेरियामध्ये 64 लाख, पाकिस्तानात 50 लाख आणि इंडोनेशियात 40 लाख बालकांचा जन्म होण्याचा अंदाज आहे. भारतात जानेवारी 2020 पासून ते डिसेंबर 2020 दरम्यान 2.41 कोटी बालके जन्माला येतील, असे अहवालात म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com