पुण्यात आज 143 जण करोना पॉझिटिव्ह ; 12 मृत्यू
Featured

पुण्यात आज 143 जण करोना पॉझिटिव्ह ; 12 मृत्यू

Dhananjay Shinde

पुणे (प्रतिनिधी) –  पुण्यात आज दिवसभरात 12 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर दिवसभरात 143 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, आज 119 करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आतापर्यंत पुण्यात करोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 8205 इतकी झाली आहे. त्यापैकी बरे होऊन घरी सोडलेल्या एकूण रुग्णांची संख्या 5304 झाली आहे. पुण्यातील सध्याची अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2498 इतकी आहे.

सध्या एकूण 189 गंभीर रुग्ण असून 37 जणांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.पुण्यात आतापर्यंत करोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 55 झाली आहे. आज दिवसभरात एकूण 1697 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

Deshdoot
www.deshdoot.com