Friday, April 26, 2024
Homeनाशिकउपनगरमध्ये विदेशी पर्यटक आढळून आल्याने खळबळ

उपनगरमध्ये विदेशी पर्यटक आढळून आल्याने खळबळ

नाशिकरोड : प्रतिनिधी

नाशिकमध्ये अचानक आज सकाळी विदेशी पर्यटक आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. घटनास्थळी प्रभागाचे नगरसेवक यांनी भेट देत पोलीस यंत्रणेला पाचारण केले आहे. हे विदेशी दाम्पत्य मध्यप्रदेशहून नाशिकला आल्याचे समजते, देशभरात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले असताना परदेशी पर्यटक आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

विदेशी नागरिकांकडून कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्यामुळे स्थानिकांनी या दाम्पत्याची कोरोना तपासणी करावी तसेच पोलीस यंत्रणेला बोलवून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

प्रभाग 16 मधील उपनगरच्या मातोश्री नगर येथे काल रात्री दोन विदेशी वाहनांसह दोन विदेशी नागरिक वास्तव्यास असल्याची वार्ता पसरल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. हे दाम्पत्य जर्मनीचे असलायचे ते सांगतात.

जर्मन राजदूतांनी त्यांना अधिकृतपणे नॅशनल जियोग्राफी साठी पाठविल्याचे ते सांगत आहेत. तसेच घटनास्थळी स्थानिक पोलीस यंत्रणा दाखल झाल्यानंतर त्यांनीदेखील या घटनेची चौकशी केली.  यादरम्यान, पोलीस यंत्रणेचे जर्मन राजदूत कार्यालयाशी बोलणे झाल्याचे समजते.

वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार, पोलिसांनी सदर विदेशी नागरिकांना द्वारका पर्यंत पोहोचवल्याचे समजते.

स्थानिक नागरिक, ज्याने आश्रय दिला त्याचे नाव जॉन्सन होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक अनिल ताजनपुरे यांनी तीन 3 कॉन्स्टेबलसह घटनास्थळी विचारपूस केली होती.

दरम्यान, जिल्हयाच्या सीमा बंद असताना ते नाशिकमध्ये आले कसे?, रात्री पेट्रोल पंप बंद असताना ते एमपी मधून महाराष्ट्रात कसे आले, जॉन्सन नामक स्थानिक नागरिकाने या विदेशी नागरिकांना रात्रभर आसरा देताना पोलीस प्रशासनास कळवले नाही असे प्रश्न उपस्थित होते.

ज्याच्या घरासमोर हे विदेशी नागरिक रात्रभर गाडीत होते, त्या जॉन्सनची कोरोना तपासणी करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

नगरसेविका सुषमा पगारे यांनीही फोनवरून मनपा प्रशासनाशी संपर्क साधल्याचे समजते. दरम्यान, परिसरात भीतीचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या