FB POSTS : अखेर ‘उबर इंडिया’ने मागितली ‘ती’ची माफी!

0

वेबसीरिज फेम मल्लिका दुआ हिला उबर चालकाने शिवीगाळ केल्याचा प्रसंग तिने तिच्या फेसबुकवरून पोस्ट करत सांगितला.

“मी चालकाला फक्त एसीचं तापमान वाढवण्यास सांगितलं. त्यावर त्याने माझ्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याने ‘ट्रीप’ संपवत ‘उतर गाडी से’ म्हणत मला बाहेरचा रस्ता दाखवला. एसी वाढवणार नाही यावरच तो अडूनच राहिला होता. ‘उबरला तुमची स्वत:ची कार समजा सांगतात तसं असं काही नसतं’, असं तो वारंवार म्हणत होता. त्यानंतर आमच्यात कडाक्याचं भांडण झालं’, असं मल्लिकाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

मल्लिकाने जाहीरपणे हा सर्व प्रकार उघड केल्यानंतर ‘उबर इंडिया’तर्फे तिची माफी मागण्यात आली. खुद्द मल्लिकानेच याविषयीची माहिती तिच्या फेसबुक पोस्टद्वारे दिली. ‘त्या चालकावर कारवाई करण्याचं आश्वासन उबर इंडियाने मला देऊ केलं आहे. अशा प्रकारची मुजोरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही’, अशा थेट शब्दांमध्ये तिने ही पोस्ट केली.

 

LEAVE A REPLY

*