नवीन नाशिकमध्ये रस्त्यातील वीजप्रवाहामुळे गाईचा मृत्यू; महिलेलाही धक्का

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) ता. १३ : येथील प्रभाग क्र.२५ मधील पवननगर पोलीस चौकी मागील रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या भूमिगत वीज वाहक केबलमुळे विजेचा प्रवाह रस्त्यात उतरल्याने एका गायीला प्राणास मुकावे लागल्याची दुर्घटना घडली.

गाईचे शव उचलण्यापूर्वी तिची पूजा करण्यास आलेल्या सरला किरण चौरे या महिलेला देखील विजेचा जोरदार झटका बसला. त्याचवेळी जवळच असलेले नगरसेवक शामकुमार साबळे यांनी प्रसंगावधान राखून महिलेला तात्काळ दूर केल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान घटना घडल्यापासून वीज वितरण कंपनीला अनेकदा संपर्क साधूनही संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित होऊ शकले नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कालांतराने परिसरातील वीज प्रवाह बंद केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी गायीला तेथून हलविण्यात आले.

या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वीच काँक्रीटीकरण करण्यात आले असून त्यावेळी रस्त्याखालून निकृष्ट दर्जाच्या केबल वापरण्यात आल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

 

LEAVE A REPLY

*