Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : सासू-सासर्‍याच्या नात्याला काळिमा; सासर्‍याचा सुनेवर अत्याचार

Share

नाशिक । प्रतिनिधी

सासू-सासर्‍याच्या नात्याला काळिमा फासल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली. सासर्‍याने सुनेवर वारंवार अत्याचार केल्याची तक्रार पीडित विवाहितेने दिली असून संशयित सासर्‍यासह पती आणि सासूविरोधात अत्याचार, छळ, मारहाण केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार 1 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत सासर्‍याने राहत्या घरात तसेच कारमध्ये वारंवार अत्याचार केला. तसेच याबद्दल कोणाला काही सांगितल्यास मुलासोबत संसार करू देणार नाही, अशी धमकी दिली.

ही बाब पीडितेने अखेर तिच्या पतीसह सासूला सांगितल्यानंतर दोघांनीही तिला मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ केला. तर सासूने पीडितेच्या हाताची नस कापून दुखापत केली. अखेर या छळाला कंटाळून पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

अत्याचार करणारा नराधम सासरा राजकीय पदाधिकारी असल्याचे समजते. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात ही धक्कादायक तक्रार दाखल झाली आहे. आरोपीला अटक करून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणातील संशयित सासरा, पती आणि सासूवरही बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!