नाशिकच्या ऑनर किलिंग घटनेतील पित्यास फाशी

0

नाशिक – मे २०१३ मध्ये पोटच्या लेकीने आंतरजातीय विवाह केल्याने त्याचा राग मनात धरून मुलीला आईला भेटण्यासाठी नेतो असा बहाणा केला. त्यानंतर रिक्षातच गरोदर असणाऱ्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. नाशिकमध्ये ऑनर किलिंगची ही पहिलीच घटना होती.

या घटनेची आज नाशिकमध्ये सुनावणी झाली. यात दोषी असणाऱ्या पित्याला फाशीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने आज सुनावली.

गरोदर विवाहितेच्या खून प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या पित्यास एकनाथ किसन कुंभारकर (वय 47) याला त्याच वेळी पोलिसांनी अटक केली होती. तसेच घटनेच्या तपासासाठी तत्कालीन सरकारवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांनी तपास अधिकारी म्हणून काम बघत होते.

शेवटी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी मुलीच्या बापाला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. यावेळी सरकारी वकील म्हणून पौर्णिमा नाईक यांनी काम बघितले. लेकीचा खून करणाऱ्या पतीला फाशी द्यावी अशी मागणी मृत मुलीच्या आईने केली होती.

LEAVE A REPLY

*