Friday, April 26, 2024
Homeनगरमुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने पित्याचे निधन

मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने पित्याचे निधन

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील धनाजी संपत धेंडे (वय 46) यांनी नापिकी आणि सोसायटी कर्ज, खाजगी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. याचा धक्का बसल्याने या शेतकर्‍यांचे वडील संपत नामदेव धेंडे (वय 62) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
शेडगाव येथील धनाजी धेंडे हे शेतात पारंपरिक पिके घेत होते. मात्र, नसर्गाच्या लहरीपणामुळे व शेतातून खर्चापेक्षा उत्पन्न कमी येत असल्याने यापूर्वी घेतलेले सोसायटी, बँक व खाजगी सावकारांच्या कर्ज असल्याने त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. पोटच्या मुलाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांचे वृध्द वडील संपत नामदेव धेंडे यांचा अकस्मात मृत्यू झाला. धनाजी यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. मात्र, त्यांनी जीवनयात्रा संपवल्याने शोककळा पसरली. यात मुलगा आणि वडील या दोघांचा मृत्यू या कुटुंबासाठी धक्कादायक असल्याने गावावर शोककळा पसरली. उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतकर्‍यांनी पिकवलेल्या मालाला बाजारभाव मिळत नसल्याने व अवकाळी पावसाने खरीप आणि रब्बी पिकांचे झालेले नुकसान. त्यातच बँक, सेवासंस्था वसुलीचा धाक यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असल्याने असे प्रसंग घडत असल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या