Type to search

नंदुरबार फिचर्स मुख्य बातम्या

अक्कलकुवाजवळ तिहेरी अपघातात पिता-पुत्री ठार

Share

अक्कलकुवा  –

अक्कलकुवा-खापर रस्त्यावर नयनशेवडी फाटयाजवळ तिहेरी अपघातात पितापुत्री जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे.

अक्कलकुवा ते खापर दरम्यान असलेल्या नयन शेवडी फाट्याजवळ बोलेरो (क्रमांक एम.एच.41 सी 3756) व ट्रक (क्रमांक एम.एच.21 एक्स 7801) व एम.एच. 40 बी.एल.1262 यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पिता-पुत्रीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तीनही वाहने खापरकडून अक्कलकुवाच्या दिशेने येत असताना पुढे अवजड कंटेनरमध्ये बोलेरो गाडी व त्यामागे ट्रक येत असताना मधली बोलेरो गाडी या दोन्ही अवजड वाहनांच्यामध्ये दाबली गेल्याने हा विचित्र अपघात झाला.

सध्या देवमोगरा मातेची यात्रा सुरू असून हे भाविक मातेच्या यात्रेसाठी देव मोगरा येथून परत आपल्या गावी येत असताना अक्कलकुवा ते खापर दरम्यान असलेल्या नयन शेवडी या गावाजवळ ट्रक व बोलेरो गाडी यात भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले असून उर्वरित सहा प्रवासी जखमी झाले यात मृतांमध्ये वडील व मुलगी यांचा समावेश आहे.

गणेश भामण्या वसावे (वय 50) व रिना गणेश वसावे (वय सात वर्ष) हे जागीच ठार झाले आहेत. तर चंद्रसिंग अमरसिंग वळवी (वय 40 रा. मोरांबा), सुभाष मोहनसिंग वसावे नयन शेवडी, राधिका निलेश वसावे (खालचा पाडा), करीनाबाई भामट्या वळवी (मोरंबा) हे गंभीर जखमी झाले आहेत. या गंभीर जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

रोहित राजू वसावे जामली व मोगरी राजू वसावे जामली हे किरकोळ जखमी असल्याने अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बाळापुरे हे उपचार करत आहेत. घटनास्थळी अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, डी.डी.पाटील, पोलीस निरीक्षक गायधने यांनी धाव घेऊन ताबडतोब जखमींना रुग्णालयात हलविले.

या महामार्गावर अतिशय जीवघेणे खड्डे पडले असल्याने होणार्‍या अपघातात वाढ झाली असून हा महामार्ग अजून किती लोकांचे प्राण घेईल हे येणारा काळच सांगणार आहे. सध्या देव मोगरा मातेची यात्रा सुरू असल्याने भाविक लाखोंच्या संख्येने याठिकाणी दर्शनासाठी जात असतात. मात्र सदर महामार्ग हा इतका जीवघेणा झालेला आहे की वाहने चालवणे अतिशय जिकिरीचे झाले असून हा मार्ग अनेकांचे प्राण घेत आहे. महामार्गाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी निद्रेत असल्याने जनतेत संताप व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!