Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याAccident : विचित्र अपघात, अनेक वाहने एकमेकांवर आदळली; पुणे-मुंबई महामार्गावरील घटना

Accident : विचित्र अपघात, अनेक वाहने एकमेकांवर आदळली; पुणे-मुंबई महामार्गावरील घटना

पुणे | Pune

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Pune-Mumbai Expressway) मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, या महामार्गावर वाहनांचा वेगही तसा जास्तच असतो, यामुळे येथे अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसते. अपघातांच्या घटना याठिकाणी वारंवार होत असतात.

- Advertisement -

आज पुन्हा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात (accident) अनेक वाहनं एकमेकांना धडकली असून मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भयानक होता की, वाहने एकमेकांना धडकून, एकमेकात अडकली होती.

Misal Pav : झणझणीत ‘मिसळ पाव’चा जगभरात डंका; ‘या’ यादीत पटकावला ११ वा नंबर

खोपोली (Khopoli) एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याचे कळते आहे. मात्र, झालेल्या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत त्यामुळे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, या विचित्र अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे मोठा गोंधळ झालेला बघायला मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या