शेती औजारांसाठी दिड कोटी रुपयांचा निधी प्राप्त

0
प्राधान्यक्रमानूसार मिळणार यंत्र खरेदीसाठी पूर्वसंमती

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानातंर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी जिल्ह्याला 1 कोटी 48 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सोडत पध्दतीने निवडलेल्या लाभार्थीयांना प्राधान्यक्रमानूसार यंत्र खरेदीसाठी पुर्वसंमती देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर निधी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक पंडीत लोणारे यांनी दिली.

अनुदानावर टॅक्टर चलीत विविध प्रकारचे औजारे अनुदानावर खरेदीसाठी जिल्ह्यातून प्राप्त 14 हजार 368 प्रस्तावामधून सोडत पध्दतीने पात्र लाभार्थीयांची सोडत पध्दतीने यापुर्वी निवड केली आहे.त्यासाठी तालुकानिहाय सोडत पध्दतीने प्रक्रिया राबविण्यात आली. उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत प्राप्त अर्जामधून ड्रॉ पध्दतीने शेतकर्‍यांची सेवा जेष्ठतेनूसार क्रमवारी निश्‍चित करण्यात आली आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी 13 मे 2017 पर्यत इच्छुक लाभार्थी शेतकर्‍यांनी संबधित कृषी सहाय्यकामार्फत मंडळ कृषी अधिकार्‍यांकडे अर्ज केले.उन्नत शेती,समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत सुरु असलेल्या या योजनेत शेतकर्‍यांना अर्ज करण्यासाठी 19 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.
केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत तपासणी संस्थांनी यंत्र व अवजाराचे परीक्षण करुन ते बीआयएस अथवा सक्षम संस्थाच्या निश्‍चित प्रमाणकानुसार निकष पुर्ण केलेले अपेक्षित आहे.

याच अवजारांची शेतकर्‍यांना खुल्या बाजारातून टॅक्टर व इतर अवजारांची खरेदी करावी लागणार आहे.रोखीने खरेदी न करता बँकेच्या खात्यावरुन रक्कम देणे अपेक्षित आहे. खरेदीसाठी पूर्वसंमती आवश्यक आहे. नसताना केलेली खरेदी ग्राह्य धरली जाणार नाही.अनुदानासाठी देयक अदा केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांची पूर्वसंमती आवश्यक आहे.

त्यानंतरच खरेदी करता येणार आहे. जिल्ह्याला मिळणार्‍या टॅ्रक्टरसह यंत्र व अवजार वाटपाच्या 40 टक्के निधी ट्रॅक्टर खरेदी करणार्‍या लाभार्थीयांसाठी तर, उर्वरीत 60 टक्के निधी कृषी यंत्र व अवजारांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

या यंत्रासाठी मिळणार अनुदान –
टॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टरचलीत नांगर, रोटाव्हेटर, पेरणीयंत्र, भात लावणीयंत्र, रिपर कम बाईंडर, मळणीयंत्र, (डी-स्टोनर,पॉलीशिंग,ग्रेडींग, पॅकींग)कल्टिव्हेटर, मिनीभात मिल, दालमील, पुरकयंत्र संच, पा टॅ्रक्टरचलीत फवारणी यंत्र, मिस्ट ब्लोअर, सब सॉयलर, प्रक्रिया संयत्रे, कापूस पर्‍हाटी श्रेडर, ऊस पाचट कुट्टी, मल्चर आदी अवजारे अनुदानावर मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*