संपूर्ण कर्जमाफी न केल्यास 26 जुलैपासून राज्यभर आंदोलन

0

मुंबई – सरसकट दीड लाखाच्या कर्जमाफीवर आक्षेप घेत ही आकडेवारी फसवी असल्याचा आरोप करत सुकाणू समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने पूर्ण कर्जमाफी केली नाही तर 26 जुलैपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले आणि बाळासाहेब पटारे यांनी दिली.

मुंबईत काल सुकाणू समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली. सरकारने आमच्या मागण्यांवर विचार न केल्यास 26 जुलैला राज्यव्यापी आंदोलन केले जाईल. 9 जुलै रोजी नाशिकमध्ये बैठक होईल आणि तिथूनच संघर्ष यात्रा सुरु होईल. 23 जुलैला संघर्ष यात्रेची सांगता पुण्यात होईल. या दरम्यान सरकारने केलेल्या फसवणुकीबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.

सरकारने आतापर्यंतची कर्जमाफी करणं अपेक्षित होतं. मात्र 30 जून 2016 पर्यंतची कर्जमाफीची घोषणा करून सरकारने फसवणूक केली. तसेच सरकारची कर्जमाफीची आकडेवारी फसवी असून त्याचा शेतकर्‍यांना फारसा लाभ होणार नाही. प्रामाणिक शेतकर्‍यांना देण्यात येणारे अनुदानही फसवे असल्याचा आरोप सुकाणू समितीने केला आहे.

दीड लाखाच्या पुढचे कर्ज एकाच वेळी भरण्याची अट घातली. ते शक्य नाही. एखाद्याकडे पाच लाख रूपये कर्ज असलेतर त्याला प्रथम साडेतीन लाख रूपये भरावे लागतील. त्यानंतर दीड लाख रूपयांचे कर्ज माफ होईल, पण शेतकर्‍यांकडे तेवढे पैसे हवेत ना, असा सवालही सुकाणू समितीने केला आहे.

LEAVE A REPLY

*