Video : उद्यापासून शेतकरी संपावर जाणार; अनेकांची आज बाजारपेठेत झुंबड

0
नाशिक : उद्यापासून शेतकरी संपावर जाणार आहे. भाजीपाल्यासह दुध पोहोचवायचे नाही असा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे.

जो बाजारात उद्यापासून माल विक्रीसाठ आणेल त्यालाही विनंती करून माल परत घेऊन जायला सांगू किंवा मातीमोल किमतीत विकला जाणारा शेतमाल गाईला चारू असा पवित्रा नाशिकमधील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

किसान क्रांतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे काहीही तोडगा निघाला नाही. म्हणून उद्यापासून शेतकरयांनी संपावर जाणार असल्याचे निश्तित झाले आहे.

पोटापुरता लागेल तेवढेच पिकवायचे, दुधाचा पुरवठा करायचा नाही शहरात दुध घेऊन जायचे नाही तसेच कोणताही शेतीमाल विक्री करायची नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

शेतमालाला योग्य हमीभाव मिळायला हवा, कर्जमाफी व्हावी अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, आज नाशिकमध्ये अनेक बाजारपेठ उद्याच्या संपाच्या पार्श्वभूमीवर फुल्ल दिसून आल्या. अनेकांनी भाजीपाल्याचा सारपा करून ठेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

नाशिकमधील मार्केटसमध्येही शेतीमाल विक्रीसाठी मोठी गर्दी दिसून आली. जिल्ह्यातील जवळपास पंधरा कोटींची उलाढाल उद्या शेतकरी संपावर जाणार असल्याने थांबणार आहे.

सध्या रमजानचा महिना सुरु आहे अशातच शेतकरी संपावर गेला तर भाजीपाला, दुधाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

*