शेतकरी प्रश्न मार्गी लावून होणार ‘समृद्धी’ – मुख्यमंत्री

समृद्धी महामार्गाची मोजणीच झालेली नाही तर शेतकरी बाधित कसे? मुख्यमंत्र्यांचा सवाल

0

नाशिक : समृद्धी महामार्गाची ६७० किमी मोजणी पूर्ण झाली आहे. शेतकरी प्रश्न मार्गी लावून होणार ‘समृद्धी’ महामार्ग पूर्ण होणार आहे.

अजून मोजणीच पूर्ण नाही झाली तर इतके-इतके शेतकरी बधिक असल्याची माहिती मिळणार कशी असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नाशिक शहर विकासासाठी दत्तक घेतलेले पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस महापालिका निवडणुकीनंतर आज प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले होते. नाशिक महापालिकेला पाणी योजनेसाठी जो निधी अपुरा पडेल तो राज्य सरकारकडून उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

नाशिकच्या विकासाच्या दृष्टीकोनातून आज पहिली बैठक याठिकाणी घेतली आहे. नाशिकचा आज स्मार्टसिटीमध्ये समावेश झाला आहे. पहिल्या दहा शहरांत नाशिकचे नाव आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नोकरभरतीवर बोलतांना ते म्हणाले तांत्रिक पदांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*