शेतकरी बेमुदत संपावर

0
 • दूध, भाजीपाला विक्री बंद; जमावबंदी केल्यास स्मशानभूमीत बसणार

अहमदनगर, पुणतांबा (प्रतिनिधी) – कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासह विविध मागण्या सरकारकडे सातत्याने करण्यात आल्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच आंदोलक शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुंबईत झालेली बैठकही तोडग्याविना निष्फळ ठरल्याने अखेर मध्यरात्रीपासून शेतकर्‍यांनी संप सुरू केला आहे. यात शहरात येणारे दूध, भाजीपाला नाक्यावर अडविण्यात येणार आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे सारख्या मोठ्या शहरात जाणारा भाजीपाला अडविण्यासाठी किसान क्रांतीची ठिकठिकाणीची टीम सज्ज झाली आहे. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, कोपरगाव, अकोले, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा सह अन्य काही मार्केट कमिट्यांचे पदाधिकारी व व्यापार्‍यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे.

एवढेच नव्हेतर संपकरी शेतकर्‍यांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चौंडी येथे स्पष्ट केले. संगमनेरात माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको, तर अकोलेत आ. वैभव पिचड यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन  करण्यात येणार आहे. शेवगावतही शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती सभापती रामनाथ राजपुरे यांनी दिली.

तसेच जिल्ह्यातील अनेक दूधसंकलन केंद्रेही बंद राहणार आहेत. तसेच जिल्हा फर्टिलायझरर्स सीड्स अ‍ॅण्ड पेस्टिसाईड्स डिलर्स असोशिएशननेही पाठिंबा दर्शविली आहे. गावावातील शेतकरीही संपात सहभागी होण्यासाठी सरसावले आहेत.

किसान क्रांतीच्या आवाहनानुसार शेतकर्‍यांच्या विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेतकरी आज 1 जूनपासून बेमुदत संपावर जात आहे. या संपात पुणतांबा परिसरातील 40 गावांतील शेतकरी सहभागी झाले असून संप यशस्वी करण्यासाठी ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. संपाचे नियोजन करण्यासाठी काल सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतीच्या सभागृहात तातडीची बैठक घेण्यात आली.

अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाप्पासाहेब वाघ होते. यावेळी किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव, तानाजी पाटील भोकरदन, अंबादास आढाव कोपरगाव, राजेंद्र तुरकणे लाखगंगा, दादासाहेब टेकाळे पाथरे, राजेंद्र टेकाळे भेर्डापूर, अण्णा भुसाळ रामपूरवाडी, ललित नीळकंड, दिलीप ठाणगे, सुरेश वाघ चितळी, भास्कर मोटकर, संभाजी गमे, रामभाऊ बोरबने, बाळासाहेब जाधव, वसंत जर्‍हाड, प्रकाश गवारे, अशोक धनवटे, प्रा. बखळे, नितीन सांबारे, डॉ. अविनाश चव्हाण, आदींसह 40 सोलापूर जिल्ह्यात 95.22 तर पुण्यात 94.52 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नऊ विभागात झालेल्या परिक्षेत नगरच्या मुली तिसर्‍या स्थानावर आहेत. अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.
विभागनिहाय विचार करायचा झाल्यास कोकणातून सर्वाि

 • या आहेत मागण्या
 • शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा
 • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
 • उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव द्यावा
 • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी.
 • श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंद्यासह अनेक बाजार समित्यांचा पाठिंबा
 • संगमनेर, अकोले, शेवगावात रास्ता रोको
 • अनेक ठिकाणी दूध संकलन बंद राहणार
 • जिल्हा फर्टिलायझर्स असोसिएशनही शेतकर्‍यांच्या पाठीशी
 • संपकरी शेतकर्‍यांच्या पाठीशी राष्ट्रवादी ः सुळे
 • श्रीरामपुरातील सेवा केंद्र चालकही संपात
 • अकोले, जवळात आठवडे बाजार बंद
 • माधव भंडारींच्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध
 • पारनेरात नगर-कल्याण महामार्गावर चक्काजाम करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

*