शेतकरी संपात व्यापाऱ्यांचीच चांदी; एक दिवस आधीच भाजीपाल्याचे भाव गगनाला

0

नाशिक : ⁠⁠⁠⁠⁠शेतकरी संपामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले असले तरी याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून व्यापारी अक्षरशः हात धुवून घेतांना दिसत आहेत. शेतकरी संपावर जाणार असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून ठेवलेला आहे.

याची प्रचीती शेतकरी संपाच्या एक दिवस आधीच नाशिककरांना झाली. उद्यापासून शेतकरी संपावर जाणार असल्यामुळे एक दिवस आधीच पंचवटीतील मार्केट यार्डात नाशिकमधील नागरिकांनी भाजीपाला घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र याठिकाणी दररोजपेक्षा दुप्पटीने पैसे देऊन भाजीपाला खरेदी करावा लागला.

टमाट्याची जाळी एरव्ही शंभर सव्वाशे रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र आज याठिकाणी तीनशे रुपयांपर्यंत विक्री झाली. तर शिमला मिरचीदेखील दुप्पट किंमतीने विकली गेली. सोबतच इतर भाजीपालादेखील दुप्पटीपेक्षा जास्त दराने विक्री झाली आहे.

जास्त दरात शेतमाल विक्री तुरळक शेतकरी दिसून आले. मात्र इतर सगळीकडेच व्यापाऱ्यांचीच चांदी होतांना दिसून आली. व्यापाऱ्यांनी अक्षरशः ग्राहकांची लुटच केल्याचे दिसून येत होते.

शेतकरी संप काळात दुध, जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. ऐन रमजान ईदच्या काळात दुधाचा पुरवठा होत नसल्यामुळे दुधाचे दर शंभरी पार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

*