Video : नाशिकमध्ये बंदचे आवाहन करणाऱ्या शिवसैनिकांना अटक

0

नाशिक : महाराष्ट्र बंदची शेतकऱ्यांकडून हाक देण्यात आल्यानंतर अनेक संघटना या बंदला पाठींबा देतांना दिसून येत आहेत.

शिवसैनिकांनी नाशिकमध्ये एकत्र येत बंदचे आवाहन करून दुकाने बंद ठेवावीत असे सांगत असतांना पोलिसांनी २० शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

भद्रकाली पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची सुटका करून देण्यात आल्याची माहिती प्रतिनिधीने दिली आहे.

शिवसैनिकांमध्ये जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह इतर वीस जणांचा समावेश असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*