शेतकरी संप सुरूच

तलाठी, तहसिल कार्यालयांना कुलूप लावण्याचा प्रयत्न

0
नाशिक | दि.६ देशदूत चमुकडुन – राज्यात शेतकर्‍यांनी पुकारलेल्या १ ते ७ जुन पर्यतच्या शेतकरी संपात आज सहाव्या दिवशी राज्यात तलाठी, तहसिलदार व शासकिय कार्यालयालांना कुलूप लावण्याचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी सर्व बाजार समित्यात शेतकर्‍यांनी शेतीमाल पाठविला नाही.
मात्र संतप्त शेतकर्‍यांनी काही गावात तलाठी, तहसिलदार व इतर शासकिय कार्यालयांना कुलूप लावण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. आज वाहने अडवून दूध व भाजीपाला फेकण्याचा प्रकार न घडला नाही. दरम्यान येवले तालुक्यतील पिंप्री येथे शेतकरी संपात सहभागी झालेल्या तरुण शेतकर्‍यांने आत्महत्या केल्याचे समोर आल्याने संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहे.

राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपात जाहीर केल्या प्रमाणे आज तलाठी, तहसिलदार व शासकिय कार्यालयांना टाळे लावण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात निफाड व कळवळ येथील तहसिलदार कार्यालयाच्या  प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याचे आंदोलन करण्यात आले. येवला तालुक्यातील सायगांव येथे शेतकर्‍यांनी अर्धनग्न होऊन शासनाचा निषेध केला.

करंजी खुर्द येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच सिन्नर तालुक्यातील डुबरे व दिंडोरी तालुक्यातील राजापूर येथे तलाठी कार्यालयाला कुलूप लावत आंदोलन करण्यात आले. तसेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या तहसिलदार कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने शेतकर्‍यांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला.

अशाच प्रकारे जिल्ह्यात बहुतांशी तहसिलदार कार्यालयांना मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने शेतकर्‍यांना टाळा लावा आंदोलन करता आले नाही. जिल्ह्यात बहुतांशी तालुक्यात बाहेरील जिल्ह्यातील पोलीसांचा खडा पहारा ठेवण्यात आला होता. गेल्या पाच दिवसात झालेल्या शेतकरी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे हिंसक प्रकारांनी पुन्हा वर डोके काढु नये म्हणुन ग्रामीण भागात आंदोलन चिरडण्याचे काम पोलीसांकडुन सुरू आहे.

आंदोलनात पुढाकार घेणार्‍या युवा शेतकर्‍यांना नोटीसा देण्याचे आणि कारवाईची धमक्या दिल्या जात आहे. सर्वत्र मोठ्या बंदोबस्ताद्वारे पोलीसांकडुन आंदोलक शेतकर्‍यांवर दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप कोअर कमेटी सदस्यांनी केला आहे. आजच्या संपाच्या सहाव्या दिवशी शेतकर्‍यांनी संपाची धग कायम ठेवली असुन जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपला शेतीमाल बाजार समितीत आणलाच नाही.

परिणामी सर्व १७ बाजार समिती आवारात आजही शुकशुकाट बघालया मिळाला. नाशिक मार्केेट कमेटी आज सकाळी काही शेतकर्‍यांनी डांगर, मिरची, कांदा व बटाटा आणला. मात्र दुपारनंतर आवारात कोणीही फिरकले नाही. या संपामुळे व्यापारी व हमाल हे बसुन असल्याचे दिसुन आले.

ना. जावडेकरांना गुलाबपुष्प भेट
राज्यातील शेतकरी व कामगारांच्या प्रश्‍नांकडे लक्ष घालून ते सोडविण्यात यावेत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कालिदास कलामंदीर आवारात शेतकरी आंदोलन कोअर कमेटी सदस्य राजु देसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुलाबपुष्प दिले.
८ जुनच्या परिषदेत र्काअर कमेटीची पुनर्रचना
शेतकरी संपाला दिशा नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिकच्या शेतकरी बैठकीत गठीत करण्यात आलेल्या २१ जणांच्या कोअर कमेटीची पुर्नरचना गुरूवारी (८ जुन) रोजी होणार्‍या राज्यव्यापी शेतकरी परिषदेत केली जाणार आहे. जाहीर झालेल्या कोअर कमेटीतील स्थानिक नावांना पोलीसांचा हवाला देत काही शेतकर्‍यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळेच सर्व जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी काम करणारा संघटना व शेतकरी नेते यांचा समावेश यात केला जाणार आहे. परवाच्या परिषदेला बाबा आढाव, माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसेपाटील हे देखील उपस्थित राहणार आहे.

प्रशासनाकडुन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

नाशिक जिल्ह्यातून भाजीपाला व दूध मुंबई, गुजराथ व पुणे भागात पाठविला जात असल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडुन दिली जात आहे. जिल्ह्यातील शेतकरी आपला भाजीपाला, कांदा, बटाटा व दूध विक्रीसाठी बाजार समिती किंवा डेअरीत आणत नाही. सर्वच बाजार समितीत शुकशुकाट असतांना प्रशासनाकडुन दिशाभूल केली जात आहे. बाहेर जिल्ह्यातून येणार्‍या भाजीपाला, कांदा, बटाट व दुधाची वाहतुक करणार्‍या व पोलीस बंदोबस्तात जाणार्‍या वाहनांची आकडेवारी दिली जात असल्याची माहिती राजु देसले यांनी दिली.

LEAVE A REPLY

*