नाशकात शेतकरी संप सुरूच; बाजारसमित्या ओस

0

नाशिक : नगर पुणतांब्यात जरी संपाची तीव्रता कमी झाली किंवा संप मागे घेतला असेल तरी मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासने दिली आहेत ठोस निर्णय दिलेला नाही.

त्यामुळे नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी संप मागे घेतलेला दिसत नाहीये. काल आणि परवा सारखीच परिस्थिती सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसत असून सगळीकडे शुकशुकाटच आहे. याठिकाणी एकही वाहन किंवा शेतकरी माल विक्रीसाठी घेऊन आलेला नाही.

तीस जणांच्या कोअर कमिटीने प्रस्ताव धुडकावला असून संपाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.  आज अकरा वाजता नाशिकमध्ये कोअर कमिटीची बैठक होईल त्यानंतर निर्णय घेतला जाणारा आहे. तसेच सोशल मीडियातही संप मागे घेऊ नये असे काही संदेश पोस्ट होतांना दिसत आहेत.

शेतकऱ्यांच्या बैठकीचे नियोजन करण्यात येत असून असे काही संदेश सध्या सोशल मिडीयावर पोस्ट होत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की मूठभर लोकांना हाताशी धरून सरकारने संप मागे घेतल्याची घोषणा केली परंतु संप हा संपूर्ण राज्याचा होता आणि असे असताना मूठभर लोकांशी बंद खोलीत चर्चा करून संप मागे घेतल्याची घोषणा केली परंतु बहुसंख्य शेतकरी बांधवांच्या भावना अतिशय तीव्र अशा स्वरूपाच्या असून त्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांची मिटिंग आयोजित केली असून सर्वानी उपस्थित रहावे
तसेच आपआपल्या भागातील लोकप्रतिनिधींना पण उपस्थित रहाणेस सांगावे.

असे काही संदेश पोस्ट होत असून मुख्यमंत्र्यांचे आश्वासन येथील शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे चित्र दिसून येते आहे.

LEAVE A REPLY

*