दळवट येथे हवेत गोळीबार; गुजरातकडे जाणारा शेतमाल अडवला

0

नाशिक : कळवण तालुक्यातील दळवट येथे २०० ते ३०० ग्रामस्थ फाट्याजवळ पोहोचले. त्यांनी या रस्त्यावरून गुजरातकडे जाणारा शेतमाल अडवून ठेवला होता.

संतप्त जमावाने अभोणा पोलीस ठाण्याच्या गाडीवर दगडफेकही केल्याचे समजते, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करत हवेत गोळीबार केला.

दरम्यान, शेतकरी संपाबाबत आज सायंकाळी नाशिकमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, बुधाजीराव मुळीक यांच्यासह विविध शेतकरी नेत्यांच्या समवेत नाशिकमध्ये बैठक आयोजित केली आहे.

LEAVE A REPLY

*