Video : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घ्या – वकील विचार मंचची मागणी

0

नाशिक  | महाराष्ट्रातील शेतकरी सततचा दुष्काळ, गारपीट, नापिकी व शेतमालाला न मिळणाऱ्या हमीभावामुळे चारही बाजूंनी संकटात सापडला आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. एक जूनपासून शेतकरी संपावर गेला आहे. याकाळात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे निवेदन आज वकील विचार मंचच्या वतीने देण्यात आले.

शेतकरी आंदोलनाचा शासनाकडून शेतकरी प्रश्नावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत.

यादरम्यान, अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, कर्जमुक्ती देण्यात यावी, हमीभाव देण्यात यावा, कायमस्वरूपी विज उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, अशा नऊ ते दहा मागण्या वकील विचार मंचच्या वतीने मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*