Video : नाशिक जिल्ह्यात शेतकरी एल्गार; नैताळ्यात गावबंद तर मनमाडमध्ये लिलाव बंद पाडले

0
नाशिक | आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना तातडीने सरसकट कर्जमाफी देण्याच्या प्रश्नावर सरकार विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने घेत आज जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्त करून त्यांचा ‘सातबारा’ कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला. 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू दिले जाणार नाही असा इशारादेखील शेतकऱ्यांनी दिला आहे.

निफाड तालुक्यातील नैताळे येथील राजेंद्र बोरगुडे यांना आज जर चक्का केले तर तडीपार करू अशी पोलिसांनी तंबी दिली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी गावात बंद पुकारण्यात आला आहे. गाव बंद ठेवल्यामुळे या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तर मनमाड़मध्ये  बाजार समितीचे लिलाव बंद पाडण्यात आले.  तसेच पुणे-इंदौर मार्गावर रास्ता रोको सुरु केला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. 

 

LEAVE A REPLY

*