Video : शेतकरी जिंकेपर्यंत संप सुरूच राहणार; उद्या महाराष्ट्र बंदची हाक; शेतकरी प्रतिनिधीच्या बैठकीत निर्धार

0

नाशिक : संपूर्ण राज्यांचे लक्ष लागून असलेल्या शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत बळीराजाचा संपूर्ण विजय होईपर्यंत संप सुरच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या छातीवर बसून सर्व मागण्या पूर्ण करून घेण्याचा निर्धार करताना शेतकर्‍यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.

दरम्यान सोमवारी पुकारलेला महाराष्ट्र बंद हा संपाचा मुख्य केंद्रबिंदू असून बंद शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी केला. त्यामुळे आजपर्यंत शेतकरी संप फारसा गांभिर्याने न घेणार्‍या राज्यसरकारच्या अडचणीत अधिक भर पडणार आहे. नाशिक बाजार समिती प्रांगणात राज्यातील शेतकरी प्रतिनिधींची बैठक शेकडो शेतकर्‍यांच्या उपस्थित आज सायंकाळी पार पडली.

बैठकीला जमलेल्या राज्यभरातील शेतकर्‍यांनी जलसंपदा मंत्री गीरीष महाजन यांनी काल संपात शेतकरी नसून गुंड असल्याच्या वक्तव्यांचा निषेध केला. तसेच संपात बळी गेलेल्या कोपरगाव तालुक्यातील नाटेगावचे शेतकरी अशोक मोरे यांना आदरांजली वाहण्यात आली.

यानंतर राजू देसले यांनी संपादरम्यान शेतकर नोंदवलेले सर्व गुन्हे मागे घ्यावे. शेतकर्‍यांच्या मागण्याबाबत अश्वासन नको, तर निर्णय हवा. सोमवारचा महाराष्ट बंद शंकर टक्के यशस्वी करा. तसेच संपाबाबत पुढल दिशा 8 जून रोजी नाशिकमध्ये राज्यव्यापी बैठकीत घ्यावा असे चार ठराव मांडले. हे चारही ठराव उपस्थित शेतकरी बांधवांनी एकमताने मंजूर केले.

यावेळी बुधाजी मुळीक यांनी शेतकर्‍यांना रडून नाही तर लढून आपले हक्क मिळवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, शेतकरी नेते शरद जोशी यांनी नाशिकमधून शेतकरी चळवळीची सुरूवात केली होती, त्याच नाशिकने आता शेतकरी संपाचे नेतृत्व स्विकारले असल्याने हा संप निश्चितपणे यशस्वी होणार आहे. शेतीमाला हमीभाव, 60 वर्षानंतर पेन्शन, स्वामिनाथन आयोग या शेतकर्‍यांच्या मागण्या पुर्ण होणे आवश्यक आहे. तसेच अस्मानी वा सुल्तानी अशा कोणत्याही कारणाने शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यास सरकारने कायदेशील नुकसान भरपाई द्यावी.

सरकार उद्योजकांचे हजारो कोटी रुपये कर्ज माफ करत असेल तर शेतकर्‍यांचे कर्ज का माफ करू शकत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारचे तोंड उघडण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंद ठेवून नाक दाबण्याचे आवाहन मुळीक यांनी केले.

डॉ. अनिल नवले म्हणाले, रात्री अपरात्री बैठक घेवून सरकारने शेतकर्‍यांचा एैतिहासिक संप मोडण्याचा प्रयत्न करून शेतकर्‍यांच्या शेपटावर पाय दिला आहे. त्यामुळे शेतकरी संतापला असून सरकारला रडवल्याशिवाय राहणार नाही. यापूढे संप अधिक तीव्र करावा. गरज पडल्यास, रास्ता रोको, रेल्वे रोको करण्यास तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी संपाला राजकीय नेतृत्व नसले तरी यापूढे शेतकर्‍यांची शिकलेली मुले संपाचे नेतृत्व करतील. सोमवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी शेतकर्‍यांच्या पाया पडतील असा विश्वासही नवले यांनी व्यक्त केला. शेकर्‍यांना पुरतील एवढे जेल सरकारकडे नसल्याने प्रशासनाने शेतकर्‍यांची दडपशाही करू नये, अन्यथा शेतकरी सरकारला सळो की पळो करतील असा इशाराही त्यांनी दिला.
संपूर्ण कर्जमाफीवर बोलताना रामचंद्र पाटील म्हणाले, सरकारकडे शेतकर्‍याचे देणे आहे, म्हणून शेतकरी पूर्ण कर्जमाफी मागत असल्याचे म्हटले. शेतकर्‍यांची नाराजी आजवर कोणत्याही सरकारला परवडलेली नसल्याच्या इतिहासाची त्यांनी आठवण करून दिली. शेतमाल विक्रीतील सरकारचा हस्तेक्षेप थांबवला तर कर्जमाफीची गरज पडणार नसल्याचे त्यांनी सांगीतले.

निवडणूक काळात स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे अश्वासन भाजप सत्तेत विसरले. सरकारची शेतकर्‍यांप्रति संवेदनशीलता बोथट झाल्याने बळीराजाला संपाचा मार्ग धरावा लागला. अजूनही सरकार संपादकडे गांभीर्याने पाहत नसले तर शेतकरी सरकारच्या छातीवर बसून आपल्या मागर्‍या मान्य करून घेईल.

त्यासाठी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन हंसराज वडघुले यांनी केले. अल्पभूधारक शेतकर्‍यांची कर्जमाफी मान्य करून संप मागे घेतल्यास इतर शेतकर्‍यावर अन्याय होईल. त्यामुळे कर्जमाफी सरसकट मिळणे आवश्यक असल्याचे गोकूळ काकड म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*