सोमवारी शेतकऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’, पुणतांब्यातील किसान क्रांती कोअर कमिटीची घोषणा

0

अहमदनगरच्या पुणतांबा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत किसान क्रांती कोअर कमिटीने येत्या ५ जून रोजी मुंबई वगळता महाराष्ट बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

शेतकरी संपाला दोन दिवस होत असतानाही राज्यसरकारने कर्जमाफी बाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमावारी म्हणजेच ५ जून रोजी मुंबई वगळता महाराष्ट बंदची हाक दिली आहे.

तर ६ जून रोजी सर्व सरकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*