शेतकरी संप सुरूच; जिल्ह्यात रास्ता रोको; संप सुरूच ठेवण्याचा निर्धार

0

नाशिक : विंचुर त्रिफुलीवर शेतकऱ्यांचे दूध ओतून रस्ता रोको आंदोलन  आज विंचुर कडकडीत बंद

पिंपळगाव बसवंत येथील रविवारच्या आठवडे बाजारात शुकशुकाट; बंद शांततेत


पंचकेश्वर दावचवाडी रोड येथील लोखंडे बस स्थानकावर काळी पिवळी मधे दूध घेवून जात असतांना पकडले.

Video :

देवळा तालुक्यातील दहीवड येथे शेतकरी संपाच्या आजच्या चौथ्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी मुंडण केले. तसेच गावातून सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत रोष व्यक्त केला. आजचा देवळा येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला असून उद्या शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

खडकमाळेगावला मुख्यमंत्र्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

सिन्नरचा आठवडे बाजार बंद.

LEAVE A REPLY

*