Photo Gallery : शेतकरी संपाचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद

0

देशदूत डिजिटल चमू : नाशिक शेतकरी संपाचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद उमटतांना दिसून येत आहेत. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर आठ शेतकरी लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

त्यानंतर त्या  शेतकऱ्यांशी संपर्क होत नसल्याची चर्चा परिसरात आहे. लासलगाव-चांदवड मार्गावरील टाकळी फाट्यावर शेतकऱ्यांनी गाडी अडवून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर टाकल्या आहेत. अनेक शेतकरी किरकोळ विक्रेत्यांना बंद पाळण्याचे आवाहन करत आहेत.

नैताळेमध्ये भाजीपाला, कांदा, डाळींब शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले. येवला तालुक्यातील सायगाव येथे शेतकरी संपावर गेले आहेत. सायगावात माधव भंडारी यांच्या पुतळ्याचे दहन केले असून कर्ज वसूली जप्ती नोटिसचे दहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*