वकिलांकडून संपकरी शेतकर्‍यांचा विनामुल्य जामीन

0
नाशिक : शेतकर्‍यांनी पुकारलेल्या राज्यस्तरीय आंदोलनात शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच शेतकर्‍यांच्या मुक्ततेसाठी मोफत कायदेशीर सल्ला व जामीन देण्यात येत आहेत.

याची व्याप्ती वाढविण्यासाठी शेतकरी बचाव नाशिक जिल्हा वकील कृती समितीतर्फे येत्या सोमवारी (ता. 12) जिल्ह्यातील वकीलांची महत्त्वपूर्ण बैठक हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. वसंतराव पेखळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

8 जुनला झालेल्या सुकाणू सुमितीच्या बैठकीनंतर शेतकरी आंंदोलन अधिक तीव्र होणार आहे. जिल्हाधिकारीकार्यालय, तहसिल कार्यालय येथे ठिय्या आंदोलन, मंत्र्यांना गाव बंदी यासह विविध नियोजन शेतकर्‍यांनी केले आहे. शेतकरी संपाच्या पहिल्या टप्प्यामध्ये शेतकर्‍यांवर गंभीर स्वरुपाचे व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्यासंदर्भात शेतकर्‍यांनी कायदेशीर मार्गदर्शन व त्यांना विनामूल्य जामीन मिळवून देण्यासाठी जिल्हा वकील कृती समितीतर्फे प्रयत्न केले जात आहेत. या समितीच्या वतीने नाशिक शहरातील लाखलगाव, म्हसरूळ येथील सुमारे 38 शेतकर्‍यांना मोफत जामीन मिळवून दिले आहेत.

शेतकर्‍यांवर जिल्हाभरात गुन्हे दाखल झाले आहेत. यापुढील आंदोलनात अधिक शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यात आहे. वकिल कृती समितीचे कार्य सर्वापंर्यंत पोहचून जिल्ह्यातील गुन्हे दाखल झालेल्या सर्व शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी वकिल कृती समिती आपली व्याप्ती वाढवत आहे.

यामध्ये जिल्हाभरातील वकिलांचा सहभाग घेतला जाणार आहे. शेतकर्‍यांची गुन्ह्यातून मुक्तता, शेतकर्‍यांच्या संपाला पाठींबा व्यक्त करतानाच, त्यांना सहकार्य व पुढील दिशा ठरविण्यासाठी येत्या सोमवारी (ता.12) सकाळी 11 वाजता जिल्हा न्यायालयासमोरील हुतात्मा स्मारकामध्ये जिल्ह्यातील वकीलांची बैठक होणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक ऍड. वसंतराव पेखले यांनी दिली.

तसेच आपल्या शेतकरी बांधवांना साथ देण्यासाठी त्यावरील खोट्या गुन्ह्यांतून त्यांची सुटका करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व वकिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सदरच्या पत्रकार परिषदेला ऍड. अशोक आडके, ऍड. अनिल तांबे, ऍड. रवींद्र ताजणे, ऍड. अरुण दोंदे, ऍड. वामन जाचक, ऍड. गंभीरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*