राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मुंडण; काढली सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा

0

डांगसौंदाने (प्रतिनिधी) | बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. त्यांनी याठिकाणी तीव्र आंदोलन छेड़ले.

राज्यसरकारची प्रतीकात्मक प्रेत यात्रा काढून शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या असलेल्या मागण्यापूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. राज्यसरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत सामुदायिक मुंडन केले.

राज्यभर शेतकरी आंदोलन अधिकाधिक तीव्र होत असताना आज डांगसौन्दाने गावात व्यापारी प्रतिष्ठने बंद ठेवत कड़कड़ित बंद पाळण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते संजय सोनवणे यांनी केले.

या आंदोलनात मोठ्या संखेने शेतकरी सामिल होत गावातून राज्यसरकारची प्रतीकात्मक प्रेत यात्रा काढून सरकारचा जाहिर निषेध केला.

या वेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करुन शेतकरी कर्जमाफी विजबिल माफ़ी, शेत मालाला हमीभाव आदी  मागण्यांच्या घोषणा शेतकरी वर्गाकडून देण्यात येत होत्या.

गावातून काढलेल्या या प्रतीकात्मक प्रेत यात्रा बसस्थानक आवारात दहन करण्यात येऊन  कांदे टमाटे मिरची आदि पिके रस्त्यावर ओतून निषेध् व्यक्त केला.

या आंदोलनात डॉ. सुधीर सोनवणे, राजेन्द्र सोनवणे, दीपक वाघ, उदय सोनवणे, कडू सोनवणे, निवृत्ति सोनवणे, अमोल सोनवणेे,  देवेन्द्र सोनवणे, बापू सोनवणे, गोविन्द जाधव, गणेश बोरसे, अशोक गौतम, मनोज बधाण, महेश सोनवणे, उमेश सोनवणे, महेंद्र मुसळे, अमलक सोनवणे, दादा बछाव, मधुकर सोनवणे, रामदास सोनवणे,  बळवंत बोरसे, केदा बोरसे, जगदीश बोरसे, संतोष परदेशी,  बापू सोनवणे, पिंटू सोनवणे, बालाजी बैरागी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*