चापडगावात दुधाचा ट्रक अडवला; बाराशे लिटर दुध रस्त्यावर ओतले

0

चापड़गाव (वार्ताहर) : सिन्नर तालुक्यातील संपकरी शेतकऱ्यांनी नळवाड़ी येथे दुध वाहतूक करणारा ट्रक अडवून दुध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.

दुधाने भरलेल्या 70 कॅनमधील जवळपास 1200 लिटर दुध ओतून देण्यात आले. तसेच दुध नेणारा व्यक्तीला समजूत  देऊन सोडून दिले.

यावेळी शासनाचा जोरदार निषेध करत ग्रामस्थांनीही शासनाविरूध्द घोषणा दिल्या. यावेळी सरपंच भारत सांगळे, पंत सांगळे, अंबादास आव्हाड, मधुकर आव्हाड, प्रल्हाद सांगळे, संदिप आव्हाड, दिलीप आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*