शेतकरी संघटनेने नेवाशात जिल्हा बँक शाखेला ठोकले टाळे

0

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे शेतकर्‍यांना तातडीने 10 हजारांचे कर्ज द्या

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – मुख्यमंत्र्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांना तातडीने 10 हजार रुपये खात्यावर वर्ग होतील असे जाहीर केले. मात्र ही रक्कम बँका अजूनही शेतकर्‍यांना द्यायला तयार नसल्याच्या निषेधार्थ काल गुरुवारी शेतकरी संघटनेने नेवासा येथील जिल्हा बँकेला टाळे ठोकले.

कॉ. बाबा आरगडे, हरिभाऊ तुवर, त्रिंबक भदगले, युवक काँग्रेसचे संभाजी माळवदे, सुभाष भदगले, सुनील वाघ, ज्ञानेश्‍वर गायकवाड, अक्षय विधाते, कैलास पवार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केटयार्ड शाखेमध्ये गेले असता असे कोणतेही परिपत्रक अजून आमच्याकडे आले नसल्याचे विकास अधिकारी श्री. वाकचौरे यांनी सांगितले.

यावर शेतकरी संतप्त झाले. कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी उद्यापासून अल्पभूधारक शेतकर्‍यांना बँकांकडून कर्ज मिळेल असे सांगितले. परंतु आजही बँका शेतकर्‍यांना कर्ज द्यायला तयार नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी बँकेला टाळे ठोकले .

यावेळी विश्‍वास जावळे म्हणाले, आजी-माजी आमदार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त देखाव्यासाठी ते काम करतात. शेतकर्‍यांच्या कर्जमाफी प्रश्‍नावर गडाखांनी तीनचार आंदोलने देखाव्यासाठी केले तर आमदार मुरकुटे हे संप काळात बिळात घुसून बसले व कर्जमाफी घोषणेनंतर गावागावात फ्लेक्स लावून आपलेच हसू करून घेतले.  यापुढे आजी-माजी आमदारांचे कसे आतून संगनमत आहे हे तालुक्याच्या जनतेसमोर पुराव्यासह आगामी काळात मांडणार आहोत.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही शेतकर्‍यांना पैसे मिळत नाहीत. एकतर मुख्यमंत्री तरी खोटं बोलताहेत किंवा बँकवाले तरी खोटे बोलत आहेत. आज पेरणीची वेळ आहे आणि आता जर शेतकर्‍यांना मदत मिळत नसेल तर नंतर लाखोंची मदत देऊन फायदा काय?  मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही शेतकर्‍यांना पैसे मिळत नाहीत. एकतर मुख्यमंत्री तरी खोटं बोलताहेत किंवा बँकवाले तरी खोटे बोलत आहेत. आज पेरणीची वेळ आहे आणि आता जर शेतकर्‍यांना मदत मिळत नसेल तर नंतर लाखोंची मदत देऊन फायदा काय?  – त्रिंबक भदगले

LEAVE A REPLY

*