शेतकर्‍यांच्या एकजुटीमुळेच संपाला यश : धनंजय जाधव

0
पुणतांबा(वार्ताहर)- किसान क्रांतीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील शेतकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे संपात सहभाग घेतला. शासनावर दबाब टाकला त्यामूळे शेतकरी संपाचे आदोलन यशस्वी झाले. या आदोलनाचे सर्व श्रेय शेतकर्‍यांनाच जाते असे प्रतिपादन किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांनी केले.
किसान क्रांतीने तीन जून रोजी संप मागे घेतल्यानंतर दहा दिवसाच्या अज्ञात वासानंतर जाधव काल 12 वाजता प्रथमच पुणतांब्यात आले . त्यावेळी ग्रामपंचायती समोर शेतकरी संपाच्या यशस्वी आंदोलनाच्या विजयी मिरवणूकी नंतर आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य समन्वयक किरण सुराळकर, दत्ता सुराळकर, सर्जेराव जाधव, बाप्पासाहेब वाघ ,डॉ. अविनाश चव्हाण, रामभाऊ बोरबने, संभाजी गमे, गणेश बनकर, अभय धनवटे, बाळासाहेब गगे, दादासांबारे चंद्रकांत वाटेकर, नितीन सांबारे, सुधाकर जाधव, संजय जाधव, बाळासाहेब जाधव, भूषण वाघ आदीं शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
किसान क्रांतीच्या राज्यातील सर्व नेत्यांनी संप यशस्वी होण्यासाठी दोन महिने अथक परिश्रम केले.खा.उदयनराजे भोसले,बाबा आढाव, दिलीप मोहिते, बळीराजा संघटना, हमाल मापाडी संघटना, माथाडी कामगार तसेच शेतकर्‍यांच्या विविध संघटना, शिवसेने सह अनेक संघटनांनी पांटिबा दिल्यामूळे संपाची व्याप्ती वाढली.
संपावर तोडगा निघावा म्हणून राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ.सौ.स्नेहलता कोल्हे यांनी केलेले विशेष प्रयत्न म्हणून शेतकर्‍यांच्या 80 टके मागण्या 3 जून रोजीच मान्य झाल्या होत्या. संपाला गालबोट लागू नये व शेतकर्‍यांच्या हितासाठी किसान क्रांतीने संप मागे घेतला.
संप पुढे कोणी व का चालू ठेवला यापेक्षा शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य झाल्या याचे श्रेय शेतकर्‍यांनाच आहे. पुणतांबेकरांनी मांडलेली कल्पना राज्य नव्हे देशभर पसरळी आहे. शेतकरी एकत्र आला तर काय होते हे सर्वाना समजले.
संपाबाबद किसान क्रांतीच्या नेत्यावर केले जाणारे आरोप धांदात खोटे आहे. काही कारणांमूळे पुणतांब्यात आलो नाही त्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. संप यशस्वी होणासाठी सर्वांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.
सर्जेराव जाधव यांनी आभार मानले. चंद्रकांत वाटेकर यांनी सूत्रसंचालन केले जाधव यांचे आगमन होताच शेतकर्‍यांनी फटाक्यांची आतषबाजी करून सजविलेल्या बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली

LEAVE A REPLY

*