कर्जमाफी : पुणतांबा, श्रीरामपुरात शेतकर्‍यांचा जल्लोष

0

युध्दात व तहात पण शेतकरीच जिंकले……..

पुणतांबा (वार्ताहर)- सरकार व शेतकर्‍यांची सुकाणू समिती यांच्यात झालेल्या चर्चेनुसार राज्यातील शेतकर्‍यांचे सरसकट कर्जमाफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर करताच पुणतांबा परिसरातील शेतकर्‍यांनी जल्लोष साजरा करून निर्णयाचे स्वागत केले.
शेतकरी संपाची कल्पना पुणतांबा येथील डॉ.धनजंय धनवटे, धनजंय जाधव, धनजंय धोर्डे यांनी पुढे आणली व 3 एप्रिल रोजी पुणतांबा ग्रामपंचायतीने या प्रश्नावर विशेष ग्रामसभा घेऊन ठराव संमत केला. तसेच गावोगाव,राज्यातील अनेक जिल्ह्यात फिरून त्यांनी शेतकरी संपाचे महत्व पटवून दिले.
त्यामूळे शेतकर्‍यात जनजागृती झाली. 25 मे ते 30 मे पर्यतं पुणतांबा येथे धरणे आदोलन झाले. या आदोलनाला 38 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिबा दिला होता. त्यामुळे राज्य सरकारवर दबाब आला. विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे, कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी ह्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाची थेट मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा घडवून आणली.
अखेर काल झालेल्या चर्चेत सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाल्यामुळे शेतकर्‍यांनी जल्लोष केला पाच वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर व त्यानंतर स्टेशन रोडवरील शिवाजी चौकात शेतकरी मोठया संख्येने एकत्र आले. गुलालाची उधळण करत शेतकर्‍यांच्या लढयाला यश आल्याबद्दल जोरदार घोषणाबाजी केली व एकमेकांना पेढे भरविले.
यावेळी राहुल धनवटे, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब भोरकडे, सुरेश चव्हाण, पुरुषोत्तम जेजूरकर, पाराजी वरकड, बाबा खोसे, मुन्ना नवले, अजय जोशी, निलेश दुरगुडे, अनिल नळे तर शिवाजी चौकात झालेल्या जल्लोषात माजी सरपंच सुधाकर जाधव, बाप्पासाहेब वाघ, सर्जेराव जाधव, संभाजी गमे, विलास बोर्डे, अशोक धनवटे, नितीन सांबारे, दादा सांबारे, प्रा. डॉ. बखळे, केशवराव जाधव, प्राणिल शिंदे, भूषण वाघ, डॉ अविनाश चव्हाण, प्रताप वहाडणे, अभय धनवटे, बाळासाहेब गगे, गणेशचे संचालक राजुु थोरात, बाळासाहेब चव्हाण, विजय धनवटे, बाळासाहेब भोरकडे,
नामदेवराव धनवटे, बाबा खोसे, राहुल धनवटे, निलेश दुरगुडे, प्ाुरूषोत्तम जेज्ाुरकर, सुरेश चव्हाण, अभय चव्हाण, निलेश चव्हाण, भाऊसाहेब केरे, दिपक धनवटे, बंडु साबळे, महेश धनवटे सह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांनी स्टेशन रोडवर पदयात्रा काढून शेतकरी संपाच्या आदोलंनात सहकार्य केल्या बद्दल व्यापारी, विक्रेते शेतकरी वर्ग यांचे आभार मानले.
विशेष म्हणजे काल जल्लेष साजरा करतांनाही दोन गटांनी दोन ठिकाणी साजरा केला. पुणतांबेकरांनी शेतकरी संपावर ही सकल्पना पुढे आणून ती देशभरातील शेतकरी विविध संघटना यांनी स्वीकारली व त्याला यश मिळाल्याबद्दल परिसरात विशेष समाधान दिसून येत होते

शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी प्ाुणतांबा येथून सुरू होवून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी यात सहभागी झाले आणि न भुतो न भविष्य असे शेतकर्‍यांचे ऐतिहासिक आंदोलन उभे राहीले. या आंदोलनात अनेकांनी आपला सहभाग नोंदवून आंदोलनाची तिव्रता वाढविली. त्यामुळे सरकारला शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी लागली या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांचे तसेच दै.सार्वमतचे व शासनाचे देखील आभार मानतो.                                         डॉ.धनंजय धनवटे

श्रीरामपुरात फटाके फोडून स्वागत

भाजपा सरकारने कर्जमाफीच्या घेतलेल्या निर्णयाचे श्रीरामपूरात फटाके फोडून स्वागत करताना विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- भाजपा सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिल्याचे जाहीर होताच श्रीरामपूरशहरात विविध संघटनांच्या वतीने फटाके वाजवून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.
काल संध्याकाळी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, शिवसेना, भाजपासह विविध संघटनांनी एकत्र येवून भाजपा शासनाच्या निर्णयाचे फटाक्यांची अतीषबाजी करत जल्लोष केला. व फडणवीस सरकारला धन्यवाद दिले.
भाजपाचे फडणवीस सरकार हे शेतकरी हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन निवडणूक काळात दिले होते. ते पुर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला शब्द पाळला असल्याची प्रतिक्रीया श्रीरामपूर शहर भाजपा अध्यक्ष नगरसेवक किरण लुनिया यांनी दिली.
भाजपा सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय उशिरा घेतला आहे. तरीही या निर्णयाचे श्रीरामपूर तालुका शिवसेनेच्या वतीने स्वागत करत आहे. सरकारने शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरण्याआगोदरच घेतला असता तर तो अधिकच चांगला ठरला असता. शेतकर्‍यांचे या काळात जे नुकसान झाले ते टाळता आले असते. अशी प्रतिक्रीया शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र देवकर व शहराध्यक्ष सचिन बडधे यांनी दिली.
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने गेल्या दहा दिवसापासून आंदोलन करून जो लढा दिला त्या लढ्याला अखेर यश आले. सरकारला जाग आणण्यासाठी शेतकर्‍यांना रस्त्यावर यावे लागले. सरकारने उशिरा का होईना स्वागताहर्य असल्याची प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत उंडे यांनी दिली.
शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली पाहिजे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सुरवातीपासूनची मागणी होती. ही मागणी पुर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांना रस्त्यावर यावे लागले. तसेच स्वाभिमानीसह रघुनाथदादा पाटील यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरली त्यामुळेच ही कर्जमाफी मिळाली आहे. या सर्वांचे आभार तसेच सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी सांगितले.
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला ऐतिहासिक विजय मिळाला असून यामध्ये शेतकर्‍यांचा विजय झालेला आहे. या कर्जमाफीने शेतकर्‍यांना आधार तर मिळणारच आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच परंतू यापुढे शेतमालाला चांगला भाव मिळाला तर यापुढे कधीही कर्जमाफीची गरजही पडणार नाही. शेतकर्‍यांना मिळालेल्या कर्जमाफीचा विजय हा सर्व शेतकरी, शेतकरी संघटनांचा असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी दिली.

 

 

LEAVE A REPLY

*