सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची चेष्टा ; पालकमंत्र्यांना 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणापासून रोखणार

0

सुकाणू समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत एल्गार

अहमदनगर (प्रतिनिधी)- 14 ऑगस्ट रोजी जिल्हाभर रास्तारोको करून चक्काजामचा एल्गार पुकारल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची चेा करणार्‍या शासनाचा प्रतिनिधी असणार्‍या पालकमंत्र्याना 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यापासून रोखणार असल्याचा निर्णय जिल्हा सुकाणू समितीने घेतला आहे.

14 ऑगस्ट रोजी चक्काजामच्या पार्श्‍वभुमिवर नियोजनासाठी नगरशहरात सर्जेपुरा चौकातील रेहमत सुलतान हॉलमध्ये जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक पार पडली.यावेळी 14 ऑगस्ट रोजी तालुकानिहाय रास्ता रोको, शाळा, महाविद्यालय बंद व 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमापासून रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी जिल्हा भरातून उपस्थित शेतकरी संघटनासह कामगार,विद्यार्थी,महिला संघटनांच्या प्रतिनिधी चक्काजाम व पालमंत्र्यांना रोण्यासाठी नेमकी काय केले पाहिजे.यासंदर्भात आपली मते मांडत चर्चेत भाग घेतला.शेतकरी विरोधी भुमिका घेणार्‍यांना पवित्र तिरंग्याला हात लावण्याचा अधिकार नसल्याची भावना उपस्थित शेतकर्‍यांनी व्यक्त केली.15 ऑगस्ट रा्रीय उत्सव आहे. त्यास विरोध नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ध्वजारोहण शेतकरी किंवा सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते करावे.असे आहवान जिल्हा सूकाणू समितीने केली आहे.याबात जिल्हाधिकार्‍यांना निवदेन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी राज्य सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ.अजीत नवले,सदस्य गणेश जगताप तसेच बन्सीभाऊ सातपुते, कॉ.बाबा आरगडे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे, महेश नवले, रोहिदास धुमाळ,नानासाहेब दळवी,निलेश तळेकर, कॉ.सुभाष लांडे,अरुण जाधव, संतोष वाडेकर, अनिल देठे, सतिष पालवे, महेबुब सय्यद,राजु आघाव, डॉ.जालिंदर घिगे, अशोक सब्बन, निलेश तिळेकर, बहिरनाथ वाकळे, अरुण कान्हेरे, सचिन चाभे, विलास कदम, भास्कर तुवर, विठ्ठल माळी, अशोक पठारे, राजेंद्र गोर्डे, बाबासाहेब खराडे,बच्चू मोढवे,असिफ शेख, युवराज जगताप, दिपक देशमुख, विकास माळवे आदी उपस्थित होती.

शेतकरी क्रांतीकारी पक्ष, विविध शेतकरी संघटना, कामगार, विद्यार्थी, हमाल संघटना आदींसह विविध संघटनांची प्रतिनिधी उपस्थित होते.दरम्यान अनेकांनी चर्चेत भाग घेवून आपल्या कल्पना मांडल्या.तालुकानिहाय रास्तो करताना रा्रीय व राज्य मार्ग अडविण्याचा निर्णय घेण्यात आला.राज्याला संपाची हाक देणार्‍या जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.त्यामूळे चक्काजाम यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

पालकमंत्र्यांना रोखण्यासाठी विविध मार्ग अंवलबविण्यात येणार आहेत.आपले वैयक्तिक मत मांडताना प्रत्येकाने राज्य सुकाणू समितीचा निर्णयाला बांधील राहण्याचे मान्य केले.यापुढे कोणत्याही जाती-धर्माचे मोर्चे निघाले तर, त्यामध्ये शेतकर्‍यांचे दोन मांडावे.जिल्ह्यात तात्काळ विद्यार्थी व युवकांची सुकाणू समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा या प्रमुख मागण्यासाठी राज्यभर संघर्ष सुरु आहे.शेतकराी संप आंदोलनाच्या पार्श्‍वभूमिवर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली.मात्र, बहुतांश अटी व शर्ती घातल्ंया गेल्या.

त्यामुळेच लाखो शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत अद्याप सरकारने काहीच पावले उचली नाहीत.या पार्श्‍वभुमिवरच सुकाणू समितीने 14 ऑगस्ट रोजी चक्काजामची हाक दिली असल्याचे स्प केले.

एक बंद माझ्या बापाच्या कर्जमुक्तीसाठी – 
बापाचा उतारा कोरा व्हावा,घामाला दाम मिळावा.या मागणीसाठी जिल्ह्यातील युवक व विद्यार्थी संघटनांनी आंदोलनात सहभागी व्हावे.एक बंद माझ्या बापाच्या कर्जमुक्तीसाठी या घोषणेतर्ंगत जिल्ह्यातील विद्यार्थी संघटना सक्रिय होत आहेत.विविध पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी आता युवक सूकाणू समितीमध्ये सहभागी होवून शेतकरी प्रश्‍नासाठी पुढे यावे.दरम्यान यापुर्वीचा शेतकरी संप सोशल मिडीयाच्या माध्यमातुन यशस्वी करण्यात तरुणांचा मोठा वाटा असल्याचे राज्य सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ.अजीत नवले यांनी स्प केले.

पोलिसांना हुसकावून लावले – 
15 ऑगस्ट रोजी चक्काजाम व 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना रोखण्याचा निर्णय आदींची माहिती काढण्यासाठी गुप्त वार्ता विभागाचे पोलिस साध्या गणवेशात बैठकीत सहभागी झाले होते.दरम्यान उपस्थितांच्या हे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना बाहेर जाण्याची विनंती केली.मात्र, आम्ही पण शेतकरी आहोत.असे पोलिसांनी सांगण्याचा प्रयत्न करत ठाण मांडण्याचा प्रयत्न केला.मात्र, शेतकरी पुत्र असल्याबद्दल अभिनंदन करत समितीने त्या पोलिसांना हाकलून दिले.

नवे-जुने करुन नियमित कर्ज भरणार्‍याशेतकर्‍यांचे इतर कर्ज माफ करा –
जिल्ह्यात नवे-जुने करुन नियमित कर्ज भरणारे अनेक शेतकरी आहेत.त्याच शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे नियमित शेतकर्‍यांना कर्ज माफी द्या.याशिवाय शेडनेट, पॉलिहाऊस, शेती औजारे, ठिेबक सिंचन, बचत गट, पतसंस्था आदींचे कर्ज माफ करावे.शेतमाला उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के हमी भाव द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चात शेतकरी प्रश्‍न –
9 ऑगस्ट राज्यस्तरीय मराठा मोर्चामध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्यांसह शेतकरी कर्जमुक्तीच्या मागण्या अधिक तिव्रतेने मांडण्याची मागणी सूकाणू समितीकडून मोर्चाच्या नेतृत्वाकडे करण्यात आली आहे.याशिवाय 6 ऑगस्ट रोजी नगर येथील कन्हैया कुमार यांच्या सभेत विद्यार्थी संघटनांनी कर्जमुक्तीचा मुद्याला जोर लावावाअसे आवाहन जिल्हास्तरीय सुकाणू समितीने केली आहे.

कर्जप्रश्‍नी नौटंकी करणारे कालबाह्य होणार – 
ऐतिहासिक फसवणूक करुन शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे नाटक करणारे लवकरच कालबाह्य होणार आहे.त्यामूळे सर्वानी 14 ऑगस्ट रोजी चक्काजाम यशस्वी करण्यासाठी एकत्र यावे.सरकारला शेतकर्‍यांपुढे झुकावे लागणार हे निश्‍चित आहे.दोन वर्षात मोठे बदल घडवून येणार असल्याचा दावा यावेळी डॉ.नवले यांनी केला.

 

LEAVE A REPLY

*