Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

सरकारची कर्जमाफी फसवी – चंद्रकांत पाटील

Share
चंद्रकांत पाटील म्हणतात, उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीला आमचा विरोध नाही परंतु...chandrakant-patil-says-bjp-not-opposed-appointment-cm-uddhav-thackeray

सरसकटफ शब्द असताना कर्जमाफीत निकष का लावले?

मुंबई – महाविकासआघाडी सरकारची कर्जमाफी फसवी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस फसवत आहे असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांच्या साखर करखान्यावरील जे दोनशे कोटीच कर्ज आहे ते वाचविण्याकरता ही कर्जमाफी केली गेली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

यापूर्वीच्या सरकारने जवळपास कर्ज माफ केली आहे. त्यामुळे ही सरसकट कर्जमाफी नसल्याचे त्यांनी सांगितलं. नागपूरच्या अधिवेशनातही आम्ही शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली होती. राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी जी घोषणा केली होती तशीच ही योजना आहे. त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

त्या मागणीकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून कर्जमाफी घोषित केली. सातबारा कोरा करू, मला शेतकर्‍यांचे अश्रू पुसायचे आहेत, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले होते, याचीही त्यांनी आठवण चंद्रकांत पाटील यांनी करून दिली .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!