2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न – अर्थमंत्री

jalgaon-digital
1 Min Read

टीम देशदूत :  २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना जोडव्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाईल. पीएम किसान योजनेअंतर्गत 16 कलमी कार्यक्रम राबवला जाईल.

100 दुष्काळ ग्रस्त जिल्ह्यांसाठी खास कार्यक्रम राबवला जाणार आहे. शेतीसाठी सौरऊर्जा वापरायला प्रोत्साहन देणार असल्याचे त्या म्हणाल्या. सेंद्रिय खतं वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचं त्यांनी सांगितले.

2020 पर्यंत जनावरांसाठी 108 मिलियन टन पर्यंत चारा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. ​मासळी उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतील.

रासायनिक खत खाद्यसाठी नवे धोरण आखण्यात येईल. सेंद्रिय शेतीसाठी यापुढे अधिक प्रोत्साहन दिले जाईल. समुद्र किनारी राहणाऱ्या तरूणा वर्गाला रोजगार मिळावा यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

​2.83 लाख कोटी रुपयांची शेती आणि शेतीविषयक कामांसाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *